शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ठामपा कर्मचाऱ्यांना दिली धमकी

By admin | Updated: November 21, 2015 02:55 IST

शहरातील वेगवेगळ्या भागांतील अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी आलेल्या ठाणे महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांना स्थानिकांनी धमकी दिल्याचा

ठाणे : शहरातील वेगवेगळ्या भागांतील अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी आलेल्या ठाणे महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांना स्थानिकांनी धमकी दिल्याचा प्रकार दुसरी राबोडी आणि कळवा उड्डाणपुलाजवळील झोपडपट्टी भागात घडला. या प्रकरणी राबोडी आणि ठाणेनगर पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राबोडीतील क्रांतीनगर, गल्ली क्रमांक ११ मधील ताहीर बंग व याकुब बंग यांनी त्यांच्या ५९४ आणि ५९५ क्रमांकांच्या या घरांमध्ये लोखंडी अँगलच्या साहाय्याने सिमेंट विटांचे विनापरवाना बांधकाम केले होते. त्या ठिकाणचे बांधकाम पाडण्याचे काम १९ नोव्हेंबरला दु. ४.३० वाजण्याच्या सुमारास चालू असताना एका अनोळखीने पालिकेच्या या कर्मचाऱ्यांना धमकावले. ‘तुमच्यामुळे माझ्या नातेवाइकाला अ‍ॅटॅक आला आहे. त्याला काही झाले तर तुम्हाला सोडणार नाही,’ असे सांगून निष्कासनाची कारवाई थांबविण्यास कर्मचाऱ्यांना भाग पाडले. ठाणे महापालिका प्रशासनाच्या वतीने या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलाजवळील महागिरी येथील राजेश धारू यांचेही तळ अधिक एक मजल्याचे बांधकाम तोडण्यासाठी दु. ३.३० वाजता पालिकेचे कर्मचारी गेले असता तिथेही धारू यांनी ‘तुम्ही बांधकाम कसे तोडता, ते बघतोच’, अशी धमकी दिली. या प्रकरणीही पालिकेने ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)