शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील कुख्यात गुंड गण्या जाधव जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 22:27 IST

वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील ‘टॉप २०’ मधील एक मुख्य आरोपी गणेश सुधाकर जाधव ऊर्फ काळा गण्या (२०, रा. लोकमान्यनगर, ठाणे) याला पोलिसांनी शनिवारी सकाळी अटक केली

ठाणे, दि. 30 - लोकमान्यनगर भागातील कुख्यात गुंड तथा वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील ‘टॉप २०’ मधील एक मुख्य आरोपी गणेश सुधाकर जाधव ऊर्फ काळा गण्या (२०, रा. लोकमान्यनगर, ठाणे) याला पोलिसांनी शनिवारी सकाळी अटक केली. त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी उकळणे, अपहरण, दरोडा आणि मारहाण करणे असे २३ गंभीर स्वरुपाचे गुन्हे गण्याविरुद्ध दाखल आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून वर्तकनगर पोलीस त्याच्या मागावर होते. अनेक गुन्हे त्याच्याविरुद्ध असल्यामुळे त्याची लोकमान्यनगर भागात दहशत होती. त्यामुळेच पोलिसांच्या अभिलेखावरील ‘टॉप-२०’ गुन्हेगारांच्या यादीत त्याचा समावेश होता. त्याच्यावर यापूर्वीही महाराष्टÑ विघातक कारवाया प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत कारवाई झाली होती. तरीही या भागात त्याच्याकडून गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. ७ जून २०१७ रोजी लोकमान्यनगर पाडा क्रमांक तीन येथील रहिवाशी सनी राय (२६) या रिक्षाचालकाचा दीपक बोरसे या गण्याच्या साथीदाराबरोबर वाद झाला होता. दीपकने एका महिलेची छेड काढल्यामुळे त्याला सनीने अटकाव केल्याने हा वाद उद्भवला होता. याच वादाचा वचपा काढण्यासाठी दीपकने गण्या तसेच अन्य एका साथीदाराच्या मदतीने चाकूच्या धाकावर सनीचे अपहरण केले होते. त्याला मामा भाच्चे डोंगरावर नेऊन जबर मारहाण करून त्याच्याकडून दीड हजारांची रोकडही हिसकावली होती. याच प्रकरणात दीपक आणि विजय यादव या दोघांना पोलिसांनी अटक केली होती.दरम्यान, यातील मुख्य आरोपी गणेश जाधव हा लोकमान्यनगर भागातील मामा भाच्चे डोंगरावर येणार असल्याची टीप पोलीस नाईक हेमंत मोरे यांना त्यांच्या खबºयाकडून मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, हवालदार भूषण गावंड, माणिक आहेर आणि मोरे आदींच्या पथकाने त्याला सापळा रचून सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून रिक्षावाल्याकडून हिसकावलेली खंडणीतील दीड हजारांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. त्याला ३१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.