शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात बनावट विदेशी मद्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:50 IST

मुंबई-नाशिक महामार्गावरून ट्रकमधून छुप्या पद्धतीने होणारी बनावट विदेशी मद्याची तस्करी राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी शहापूर तालुक्यातील खर्डी येथे पकडली.

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरून ट्रकमधून छुप्या पद्धतीने होणारी बनावट विदेशी मद्याची तस्करी राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी शहापूर तालुक्यातील खर्डी येथे पकडली. याप्रकरणी ट्रकचालक संतोष सिंग, नामदेव खैरे आणि सुविनय काळे ऊ र्फ अमोल यांना अटक करण्यात आली आहे. दारूबंदी कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईमध्ये विक्रीसाठी आणलेल्या ४०० मद्याच्या बॉक्ससह कार आणि ट्रक असा ५२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्याने बेकायदा दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकाची करडी नजर असल्याचे निरीक्षक सुधीर पोकळे यांनी सांगितले.मध्य प्रदेशातून मुंबईकडे ट्रकमधून बेकायदा दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार, राज्य उत्पादन शुल्क मुंबई आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, कोकण विभागाचे विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे, अंमलबजावणी व दक्षता विभागाचे (मुंबई) संचालक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे भरारी पथकाचे निरीक्षक सुधीर पोकळे, निरीक्षक अनिल राठोड, जवान दीपक दळवी, जगन्नाथ आजगावकर यांच्या पथकाने खर्डी येथे संशयित ट्रक तपासणीसाठी थांबवला. ट्रकचालकाकडे हा ट्रकरिकामा असल्याचे सांगितले; मात्र ट्रकची तपासणी केली असता मद्याचे बॉक्स लपवल्याचे उघड झाले. ट्रकचालक संतोष याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने हे मद्य नामदेव खैरे यांचे असून ते कारमधून येत असल्याचे सांगितले. खैरे येत असलेली कार थांबवून तपासणी केली असता, मद्यसाठा आढळला. त्यांच्यासोबत काळे हाही होता. या तिघांना अटक केली.>अशी पकडली तस्करी : ट्रकमध्ये चालकाची केबिन आणि ट्रकच्या मागील बाजूस लोखंडी पट्टी नटबोल्टने फिट करून पाच फुटांचा बॉक्स करून त्यामध्ये मद्यसाठा लपवण्यात आल्याचे भरारी पथकाच्या लक्षात आले. वरकरणी रिकामा वाटणाऱ्या या ट्रकमधील ही पट्टी काढल्यानंतर त्यामध्ये मद्याचे बॉक्स सापडले. हे मद्य मध्य प्रदेशात बनवल्याची माहिती देण्यात आली आहे.