शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मीरारोड मध्ये मंदिराचे गाळे तोडण्यावरून तणाव ; लोकांनी पालिकेचा जेसीबी अडवून माजी आमदारा विरुद्ध केली घोषणाबाजी

By धीरज परब | Updated: June 29, 2024 17:22 IST

महापालिकेने अचानक येऊन कारवाई केल्या बद्दल मंदिराचे व्यवस्थापक सह लोकांनी कारवाईचा निषेध केला . 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरारोडच्या पूनम सागर कॉम्प्लेक्स जवळ एका मंदिराचे गाळे पालिकेने तोडले . त्यावरून लोकांनी  जेसीबी अडवून ठेवत मंदिराची कारवाई माजी भाजपा आमदाराच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप केला व त्याच्याविरुद्ध घोषणाबाजी करत निषेध केला . 

मीरारोडच्या पूनम सागर कॉम्प्लेक्स मध्ये स्वप्नदीप इमारतीच्या मागे श्री चतुरेश्वर महादेव मंदिर आणि नाकोडा मंदिर आहे . शुक्रवारी दुपार नंतर महापालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने जेसीबी ने महादेव मंदिराच्या लगत बांधलेले दोन गाळे तोडण्याची कारवाई केली . त्यावेळी मंदिराच्या बांधकामाचे नुकसान झाले . महापालिकेने अचानक येऊन कारवाई केल्या बद्दल मंदिराचे व्यवस्थापक सह लोकांनी कारवाईचा निषेध केला . 

माजी भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या सांगण्या वरून पालिकेने मंदिर वर कारवाई केली असा आरोप करत लोकांनी त्यांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली . अनेक वेळ पर्यंत लोकांनी मेहतांच्या नावाने घोषणा देत निषेध केला . पालिकेचा जेसीबी अडवून ठेवत घेराव घातला .  पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ . संभाजी पानपट्टे आणि उपायुक्त रवी पवार हे आल्या नंतर के के तिवारी , प्रवीण राय आदींसह जमावाने संताप व्यक्त करत पालिकेने मंदिरावर आकसाने कारवाई केली असे सांगितले . सायंकाळी अधिकाऱ्यांनी लोकांची समजूत काढून मग जेसीबी नेण्यात आला . 

धार्मिक तणाव वाढू नये म्हणून नया नांगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास सुपे हे घटनास्थळी पोलीस फाट्यासह दाखल झाले . दरम्यान पालिकेने महादेव मंदिर लगत असलेल्या नाकोडा मंदिराच्या अनधिकृत कार्यालयावर देखील तोडक कारवाई केली . तर येथील स्वप्नदीप सोसायटी सह अनेकांनी येथील दोन्ही मंदिराच्या बेकायदा बांधकामां बाबत पालिकेत तक्रारी केल्या होत्या असे पालिका सूत्रांनी सांगितले . 

नरेंद्र मेहता म्हणाले कि , मी मुझफ्फर हुसेन यांचे वडील वारले म्हणून मीरारोड दफनभूमीत कडे तेथून जात होतो . माझी ह्या बांधकामाची तक्रार नव्हती व पालिका कारवाईशी काहीच संबंध नसताना माझ्यावर खोटे आरोप केले आहेत .  मंदिराच्या जवळ गाळे बांधले होते व तक्रारी झाल्याने पालिकेने कारवाई केली असावी . अनधिकृत बांधकाम असेल तर कोणी तक्रार करायची नाही का ? . के के तिवारी ह्याने भाजपाच्या कार्यक्रमात घोषणाबाजी केली म्हणून त्याला पक्षातून काढून टाकले तसेच त्याच्यावर एका महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे व त्याचा राग तिवारी याला माझ्यावर असावा म्हणून माझी नाहक बदनामी केली आहे . मी पोलिसांना तक्रार केली आहे . 

महादेव मंदिरचे ट्रस्टी के . के . तिवारी यांनी सांगितले कि , पूजाअर्चा साठी भाविकांना परिसरात बेल फुल , दूध , पाणी आदी मिळत नसल्याने मंदिराच्या भागातच त्याची सोय व्हावी म्हणून गाळा बांधला होता .  मेहता हे आले होते व पालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून गेल्या नंतर पालिकेने मंदिरावर अचानक कारवाई सुरु केली . मात्र मंदिराचे बांधकाम तोडायला लावल्या वरून संतप्त भाविकांनी मेहतांच्या निषेधार्थ घोषणा दिल्याने ते जाणीवपूर्वक माझ्यावर आरोप करून दिशाभूल करत आहेत . मेहतांवर बलात्कार पासून असंख्य गुन्हे दाखल आहेत त्याचे काय ?   

टॅग्स :thaneठाणे