शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

तात्पुरती ‘मलमपट्टी’ ठरतेय कुचकामी, डोंबिवलीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 05:35 IST

गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते खड्डेमुक्त करा, असे आदेश केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले आहेत. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी खड्डे बुजवण्याच्या कामाला लागल्याचे चित्र शहरात दिसत आहे. परंतु, पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्येच डांबराचा भराव टाकून ते बुजवण्याचा प्रताप त्यांच्याकडून सुरू आहे.

- प्रशांत माने डोंबिवली : गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते खड्डेमुक्त करा, असे आदेश केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले आहेत. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी खड्डे बुजवण्याच्या कामाला लागल्याचे चित्र शहरात दिसत आहे. परंतु, पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्येच डांबराचा भराव टाकून ते बुजवण्याचा प्रताप त्यांच्याकडून सुरू आहे. त्यामुळे ही तात्पुरती डागडुजी एक प्रकारे थुंकपट्टी ठरत आहे.गणेशोत्सवापूर्वी खड्ड्यांमध्ये चरी भरा तसेच खड्डे बुजवलेल्या रस्त्यांची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर द्या, अशा सूचना वेलरासू यांनी अधिकाºयांना दिल्या होत्या. पावसापूर्वी, ऐन पावसात आणि पावसाळ्यानंतर खड्डे बुजवण्याची तसेच रस्ता दुरुस्तीची कामे केली जातात. यंदाच्या अंदाजपत्रकात खड्डे बुजवण्यासाठी १२ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. ११ कंत्राटदारांवर ही कामे सोपवली आहेत.पावसामुळे सध्या डांबरी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत या खड्डेमय परिस्थितीचे पडसाद उमटले होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केले जाणारे नियोजन हे ठोस कृतीअभावी कागदावरच राहत असल्याचा आरोप सर्व पक्षांच्या सदस्यांनी या वेळी केला. त्यावर गणेश विसर्जन मार्गावरील प्रमुख रस्त्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल आणि तेथील खड्डे बुजवले जातील, अशी ग्वाही प्रशासनाने दिली होती.मात्र, आयुक्त आणि स्थायी समितीने दिलेल्या निर्देशानुसार खड्डे बुजवण्यास प्रारंभ झाला असला, तरी काम करण्याची पद्धत पाहता गणेशोत्सवाच्या धर्तीवर केली जाणारी डागडुजी दिखावा ठरत आहे.पाणी आणि डांबर हे परस्परविरोधी घटक मानले जातात. पाण्यात डांबर टिकाव धरत नाही. असे असले तरी पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्ये डांबराचा भराव टाकून ते बुजवले जात असल्याचे चित्र डोंबिवली शहरातीले टिळक चौक ते घरडा सर्कलदरम्यान पाथर्ली नाका येथे गुरुवारी पाहावयास मिळाले. खड्ड्यांमध्ये डांबराचा भराव टाकला जात असताना त्यावर योग्य प्रकारे रोलर फिरवला जात नसल्याने ओबडधोबड आकाराचे निर्माण होणारे ‘पॅच’ आणखी त्रासदायक ठरत आहेत. त्यात खड्ड्यांतील पाण्यावर डांबराचा शिडकावा केला गेल्याने अल्पावधीतच ते डांबर पुन्हा उखडले जाऊन पुन्हा खड्डेमय स्थिती उद्भवत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.मागील आठवड्यातच शहरातील काही ठिकाणी खड्डे बुजवण्याची कामे झाली होती. परंतु, काही दिवसांतच पुन्हा खड्डे निर्माण झाल्याने यातून निकृष्ट कामांचा नमूनाही पुढे आला आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे....तर समज देणारयासंदर्भात केडीएमसीतील बांधकाम विभागाचे डोंबिवलीतील कार्यकारी अभियंता सुभाष पाटील म्हणाले, गणेशोत्सवाच्या धर्तीवर तसेच वाहतूक पोलिसांच्या मागणीनुसार सध्या खड्डे बुजवण्याची कामे सुरू आहेत.पाणी भरलेल्या खड्ड्यांमध्ये डांबराचा भराव टाकून बुजवण्याचा प्रकार होत असेल, तर संबंधित कंत्राटदाराला समज देण्यात येईल.दरम्यान, काम सुरू असतानाच पाऊस आल्याचे स्पष्टीकरण संबंधित कंत्राटदाराने दिल्याचे पाटील यांनी पुढे सांगितले.