शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्याचा ट्रेम्पो पकडला, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ;फटाके दुकानदारांना अभय?

By सदानंद नाईक | Updated: November 13, 2023 17:52 IST

उल्हासनगर महापालिका अधिकाऱ्याचा पराक्रम.

उल्हासनगर : कामगार रुग्णालय समोरील रहिवासी वस्तीतील फटाक्याच्या गोदमातून शनिवारी मध्यरात्री फटाक्यांचा साठा ने-आण करण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यावर, महापालिका अग्निशमन विभागाने फटाक्याने भरलेला टेम्पो ताब्यात घेतला. मात्र दोन दिवस उलटल्यानंतरही गुन्हा दाखल केला नसल्याने, विविध चर्चेला उधाण आले आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-३- कामगार रुग्णालय समोरील रहिवासी वस्तीत शनिवारी मध्यरात्री ३ वाजता आग लागल्याचा फोन स्थानिक नागरीकांकडून अग्निशमन विभागाला आला. अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांच्यासह पथक गाडी घेऊन घटनास्थळी पोहचले असता, संतप्त स्थानिक नागरिकांनी एका फटाक्याच्या टेम्पोला पकडून ठेवले होते. या विभागात फटाक्यांचे गोदाम असून रात्रभर फटाक्यांची ने-आन सुरू असल्याची माहिती नागरिकांनी बाळू नेटके यांना दिली. गोदामाला सील न करता, नेटके यांनी टेम्पो जप्त करून अग्निशमन विभाग कार्यालयात आणून ठेवला. फटाक्यानी भरलेला टेम्पो जप्त करून दोन दिवस उलटूनही, महापालिकेने काहीएक कारवाई केली नाही. यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्यानेच फटाके व्यापाऱ्यांना अभय दिल्याची टीका सर्व स्तरातून होत आहे.

 महापालिका अग्निशमन विभागाने फटाक्याने भरलेला टेम्पो पकडूनही, संबंधितांवर गुन्हा दाखल का केला नाही?. असा प्रश्न अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांना केला असता, त्यांनी कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. तर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी फटाक्याच्या गोदामाला सील केले असून फटाक्याने भरलेला टेम्पो जप्त केल्याचे सांगितले. तसेच फटाके दुकानावर कारवाईचे संकेत दिले.

 मध्यरात्री पर्यंत फटाक्याची दुकाने उघडी नेहरू चौकातील फटाक्याची दुकाने मध्यरात्री पर्यंत सुरू आहेत. असे चित्र असतांनाही महापालिका व पोलीस प्रशासन कारवाई का करीत नाही?. असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला. हे कमी म्हणून की काय, थेट रस्त्याच्या फुटपाथवर फटाके ठेवून त्याची विक्री केली जात आहे. नेहरू चौक परिसरात फटाक्याचे प्रसिद्ध मार्केट असून याठिकाणी कोट्यवधींची उलाढाल होते.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगरDiwaliदिवाळी 2023