शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

कळवा, मुंब्रा दिव्यात वीजेचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 15:43 IST

एकीकडे कोरोनाचे संकट घोगांवत असतांना दुसरीकडे दिवा आणि मुंब्य्राच्या भागात मागील १४ तास वीज गायब होती. त्यामुळे येथील नागरीक हैराण झाले होते. शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास खंडीत झालेला वीज पुरवठा शनिवारी दुपारी १ वाजता सुरळीत झाला. तर कळव्यातही शनिवारी साडेचार तास वीज पुरवठा खंडीत होता.

ठाणे : आधीच कोरोनामुळे नागरीक घरातच लॉकडाऊन झाले आहेत. त्यात आता दिवा भागात मागील १४ तास अंधार असल्याची माहिती पुढे आली आहे. या भागातील वीज पुरवठा रात्री ९.३० च्या सुमारास खंडीत झाला होता. तो शनिवारी दुपारी एक वाजता पूर्ववद झाल्याचे दिसून आले. त्यात ऊन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असतांना, दुसरीकडे कोरोनामुळे बाहेरही जाऊ शकत नसल्याने येथील नागरीकांनी टोरेन्ट विरोधात संताप व्यक्त केला. तर मुंब्य्राच्या काही भागातही वीज पुरवठा खंडीत झाला होता. दुसरीकडे कळव्यात शनिवारी सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडीत होता.              दिव्यात कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे, त्यानंतर आता येथे आता घरातून कोणीच बाहेर पडू नये यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे येथील नागरीक घरातच राहणे पसंत करीत आहेत. परंतु सध्या उन्हामुळे अंगाची एवढी लाहीलाही होत आहे की, त्यामुळे नागरीकांना घरात २४ तास पंखा लावण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही. असे असतांना दिव्यात पुन्हा एकदा विजेचा समस्येला येथील नागरीकांना सामोरे जाण्याची वेळ आली. शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास येथील वीज पुरवठा खंडीत झाला होता. परंतु तो का खंडीत झाला, वीज प्रवाह केव्ह सुरळीत होणार याचे कोणतेही उत्तर टोरेन्टकडून देण्यात येत नव्हते. त्यामुळे नागरीक चांगलेच संतापल्याचे दिसून आले. अखेर शनिवारी दुपारी १ च्या सुमारास येथील वीज पुरवठा सुरळीत झाला. दरम्यान या संदर्भात रात्री १० च्या सुमारास तक्रारी आल्याचे टोरेन्टच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.त्यानुसार फडकेपाडा (साबे फीडर) येथील भुमीगत एचटी केबलमध्य बिघाड असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर रात्रभर टीम येथे काम करीत होती. त्यानुसार या भागात ६५ मीटर ओव्हरहेड केबल तात्पुरती टाकण्यात येऊन दुपारी १ वाजता वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असल्याची माहिती टोरोन्टे माहिती जनसंपर्क अधिकारी चेतन भदियानी यांनी दिली. तर भुमीगत केबलच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. तर याच कालावधीत मुंब्य्राच्या काही भागातही वीज पुरवठा खंडीत झाला होता. दुसरीकडे कळवा भागात शनिवारी सकाळी ९.३० वाजता वीज पुरवठा खंडीत झाला होता. तो सुरळीत होण्यास दुपारी २ वाजले. त्यानंतर या भागाचा वीज पुरवठा सुरळीत झाल्याचे सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या