शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे पगार सोमवारी

By admin | Updated: February 11, 2017 03:51 IST

उल्हासनगर पालिका शाळेतील शिक्षकांना तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्यांची उपासमार होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात

उल्हासनगर : उल्हासनगर पालिका शाळेतील शिक्षकांना तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्यांची उपासमार होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात प्रसिद्ध करताच आयुक्तांनी त्याची दखल घेतली. संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. शिक्षकांच्या पगाराचा धनादेश बँकेत टाकला असून सोमवारी त्यांना पगार मिळेल असे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी वृत्ताची दखल घेत लेंगरेकर आणि मुख्य लेखाधिकारी दादा पाटील यांना बोलावून कानउघाडणी केली. पगाराबाबत त्यांच्याकडे विचारणा केली. पालिका शिक्षण मंडळ सर्वाधिक वादग्रस्त राहिले आहे. तीन महिन्यांपासून शिक्षकांचे पगार झाले नसल्याने बँकेच्या कर्जाचे हप्ते थकल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली. ‘लोकमत’मधील वृत्तामुळे शिक्षक संघटनांनी आभार मानले. सरकारने दोन महिन्यांपासून शिक्षकांच्या पगाराचे अनुदान आले नाही. शिक्षण मंडळातील पगाराचे काम लेखा विभाग बघतो असे प्रशासन अधिकाऱ्यांनी आयुक्तांना सांगितले. महापालिकेने शिक्षकांच्या पगाराचे अनुदान दरमहा दिल्यानंतर पगार झाला का नाही? पगाराचा निधी कुठे वापरला? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकाराने शिक्षण मंडळातील सावळागोंधळ उघड झाला आहे.आयुक्तांनी शाळेतील २५ टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबद्दल बोलाविले होते, अशी प्रतिक्रीया प्रशासन अधिकाऱ्यांनी दिली. तर शिक्षकांच्या पगाराचा निधी दरमहा शिक्षण मंडळाला पाठवित असल्याचे दादा पाटील म्हणाले. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराने शिक्षकांनी संताप व्यक्त केला. (प्रतिनिधी)