शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बदली प्रक्रियेवर शिक्षकांचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 01:15 IST

जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह : विरोध केल्याने निलंबनाची धमकी

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या सुमारे २४५ प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या या समुपदेशनाद्वारे करण्यात येत आहेत. मात्र, अपेक्षित असलेल्या ठिकाणी नेमणूक होत नसल्याने शिक्षकांनी शुक्रवारी गोंधळ घातला. नेमून दिलेल्या ठिकाणी गेला नाही, तर निलंबित करण्यात येईल, अशी धमकी प्रशासन आणि पदाधिकारी यांच्याकडून दिली जात असल्याने बदली प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होत नसल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ इमारतीमध्ये सुरू होती. शिक्षकांच्या या भूमिकेमुळे जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

उन्हाळी सुट्टींनंतर १७ जूनपासून जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू होत आहेत. त्याआधी रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांचा कार्यक्रम रायगड जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. रायगड जिल्ह्यात पाचव्या व सहाव्या टप्प्यातील शिक्षकांची जिल्हांतर्गत समुपदेशनाने बदली प्रक्रिया शुक्र वारी सुरू झाली. या बदली प्रक्रियेसाठी सुमारे २४५ शिक्षकांनी अर्ज केले होते. समुदेशनासाठी एका-एका शिक्षकाला आत बोलावण्यात येत होते. त्या वेळी नियमानुसार शिक्षकांनी त्यांच्या पसंतीच्या २० शाळा सुचवल्या होत्या. मात्र, त्यातील एकही शाळा त्यांना न देता दुसऱ्याच शाळांवर त्यांची नेमणूक करण्यात येणार होती. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी दिसून आली. सुचवलेल्या २० शाळांपैकी एकही शाळा न देता अन्य शाळा देण्याआधी त्या शाळेच्या जवळपासची शाळा देण्याची मागणी केली होती. नेमून दिलेल्या शाळेवर हजर व्हा, अन्यथा निलंबित करू, अशी तंबी दिल्याने शिक्षकांनी टिपणीस सभागृहाबाहेर गोंधळ घातल्याचे दिसून आले.सुमारे ४० शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पनवेल, कर्जत, उरण आणि खालापूर तालुक्यातील शाळा संपल्याचे शिक्षकांना सांगण्यात आले. तालुक्यातील समांतर धोरणानुसार बदली प्रक्रिया राबविल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. यावर शिक्षकांनी आक्षेप घेतल्याने बदली प्रक्रियेवर संशयाच्या भोवºयात सापडल्याचे दिसत होते.बदली प्रक्रि या आम्हाला मान्य नसल्याचे निवेदन काही शिक्षकांनी दिल्यानंतर वातावरण काहीसे निवळले. याबाबत न्यायालयात दाद मागण्याचा निर्धारही शिक्षकांनी व्यक्त केला. मात्र, यानंतरही प्रशासनाने बदली प्रक्रि या सुरू ठेवली होती.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, शिक्षण समिती सभापती नरेश पाटील, प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, शिक्षण अधिकारी बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, प्रभारी शिक्षणाधिकारी बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.च्शासन निर्णयात समांतर बदली प्रक्रि या राबविण्याचा उल्लेख नाही.च्बदली प्रक्रि येत समाविष्ट शिक्षकांची तसेच शाळांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही.च्बदली प्रक्रि या राबविताना अधिकाऱ्यांनी मनमानीपणे कारभार केला.च्पनवेल, कर्जत, उरण, खालापूर तालुक्यात जवळपास ८० शाळांमधील जागा रिक्त असताना फक्त ४० शिक्षकांची बदली प्रक्रि या पूर्ण झाल्यानंतर या तालुक्यांंमधील शाळांची बदली प्रक्रि या पूर्ण कशी झाली.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग