शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूतील शिक्षकाने केला लिंगाणा किल्ला सर; पहिल्याच प्रयत्नात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 00:38 IST

धाडसाची दखल महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना डहाणू  यांनी घेऊन त्यांना सन्मानित केले.

बोर्डी : डहाणू पंचायत समितीअंतर्गत साखरे कोठारपाडा प्राथमिक शाळेतील शिक्षक शांताराम गायकर यांनी कोणत्याही सुरक्षा साहित्याविना लिंगाणा किल्ला पहिल्याच प्रयत्नात सर केला आहे. हा पराक्रम करणारे ते राज्यातील पहिले शिक्षक ठरले आहेत. त्यांच्या या धाडसाची दखल महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना डहाणू  यांनी घेऊन त्यांना सन्मानित केले.महाराष्ट्रातील दुर्गप्रेमींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला लिंगाणा किल्ला सर करणे हे आव्हान आहे. रायगड आणि तोरणा या दोन किल्ल्यांच्या मधोमध आकाशाला गवसणी घालणारा हा सुळका लिंगाणा किल्ला आहे. त्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ३१०० फूट आहे. हा किल्ला संरक्षक साहित्याच्या तसेच तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मदतीने अनेकांनी आजपर्यंत  सर केलेला आहे. पण, कुठल्याही प्रकारच्या संरक्षक साहित्याशिवाय लिंगाणा सर करण्याची कामगिरी शांताराम गायकर यांनी केली.  केवळ तीनच गिर्यारोहकांनी मोहीम फत्ते केली आहे.  पहिल्यांदाच लिंगाण्याला भेट देऊन ही यशस्वी चढाई करणारे गायकर पहिलेच दुर्गप्रेमी आहेत.      शिक्षक म्हणून इतिहासाची आवड जपणारे गायकर यांनी आजपर्यंत कळसूबाई शिखर, आलंग मदन कुलंग, हरिहर गड, कलावंतीण दुर्ग, भैरव गड, अतिदुर्गम वासोटा, जीवधन, हरिश्चंद्र गड, रतनगड, ढाक बहिरी आदी गडांवर चढाई केली आहे. अध्यापनासह छंद जोपासताना उत्कृष्ट कामगिरी केल्याचे गौरवोद्गार डहाणू पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी. एच. भरक्षे, गटशिक्षणाधिकारी राठोड, उपसभापती पिंटू गहला  यांनी काढले. त्यांच्या या किल्ल्यांप्रतीचे ज्ञान तसेच अनुभवाचा फायदा अध्यापनावेळी होऊन विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी आवड निर्माण  होणार आहे. शिक्षक सेना जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी जयदीप पाटील, भूषण ठाकूर, एजाज शेख, डहाणू तालुका शिक्षकसेना अध्यक्ष विठ्ठल ठाणगे, प्रभाकर जंगम, रवी जाधव आदी शिक्षक सत्कारावेळी उपस्थित होते. लिंगाणा किल्ला सर करणे ही अभिमानास्पद बाब असून या यशस्वी मोहिमेसाठी साताऱ्याचे स्वप्निल चव्हाण, अकलूजचे शंकर शिंदे, भटकंती ग्रुप आणि वाणगाव ट्रेकर्स ग्रुपचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळेच ही अवघड कामगिरी सोपी झाली. - शांताराम गायकर, गिर्यारोहकसंरक्षक साहित्याविना शांताराम गायकर यांनी यशस्वी चढाई केल्याचे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले. त्यांच्या धाडसाची दाद दिली पाहिजे. असा पराक्रम करणारे ते दुसरे गिर्यारोहक आहेत.- शिवाजी पोटे, अध्यक्ष, लिंगाणा सुरक्षा समिती