शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

सर्व जिल्हा बँकेमध्ये श्रीमंत बँक असलेली टीडीसीसीच्या निवडणूक रिंगणात ४६ उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 23:23 IST

विद्यमान उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे हे त्यांच्या सात प्रतिस्पर्धी उमेदवारांना तोंड देत आहेत. सोमवारी शेवटच्या दिवशी ४६ उमेदवारांनी त्यांची उमेदवारी मागे घेतल्यामुळे ४६ प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या प्रचाराचा मार्ग मोकळा झाला.

सुरेश लोखंडेठाणे : दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेची पंचवार्षिक निवडणूक ३० मार्चला आहे. बँकेचे सहा संचालक बिनविरोध विजयी झाले आहेत. आता शिल्लक राहिलेल्या १५ संचालकांच्या निवडणुकीसाठी ४६ उमेदवार अंतिम रिंगणात आहेत. सोमवारी शेवटच्या दिवसांपर्यंत ४६ जणांनी उमेदवारी मागे घेतली आहे. सहकार पॅनल व महाविकास परिवर्तन पॅनलच्या नेतृत्वाखाली या बँकेचा निवडणूक प्रचार आता रंगणार आहे.

विद्यमान उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे हे त्यांच्या सात प्रतिस्पर्धी उमेदवारांना तोंड देत आहेत. सोमवारी शेवटच्या दिवशी ४६ उमेदवारांनी त्यांची उमेदवारी मागे घेतल्यामुळे ४६ प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या प्रचाराचा मार्ग मोकळा झाला. राज्यभरातील सहकारमधील  दिग्गजांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. निवडणुकीत राज्यात सत्तेवरील महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांनी एकत्र येऊन त्यांचे पुरस्कृत उमेदवार  दिले आहेत. बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या उर्वरित सहकाऱ्यांचे सहकार पॅनल तयार केल्याचे त्यांनी सांगितले. तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे महाविकास परिवर्तन पॅनल असल्याचे विद्यामान संचालक सुभाष पवार व बाबाजी पाटील यांनी लोकमतला सांगितले. 

राज्यातील सर्व जिल्हा बँकांमध्ये श्रीमंत म्हणून ओळख असलेल्या या टीडीसीसी बँकेच्या निवडणुकीसाठी १०५ जणांनी त्यांचे २०६ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी सहा जणांविरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ते सहा संचालक बिनविरोध विजयी झाले. तर या उमेदवारांच्या छाननीत आठ जणांचे अर्ज बाद झाले. 

टॅग्स :bankबँकElectionनिवडणूक