शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘आंतरराष्ट्रीय आयकॉनीक आॅचिव्हर्स अ‍ॅवार्डने’ टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील सन्मानीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 16:18 IST

सहकार क्षेत्रातील बँकांमध्ये टीडीसीसी बॅकेला आघाडीवर ठेवून १५९ कोटी ६३ लाखांचा ढोबळ नफा पाटील यांनी कौशल्यपूर्ण कामगिरीने प्राप्त करून दिला. एवढेच नव्हे तर बँकेत सहा हजार ९७८ कोटी १५ लाखांच्या ठेवी, चार हजार ५३९ कोटी २३ लाखांची गुंतवणूक, तीन हजार १३ कोटी २८ लाखाचे कर्ज वाटप, आणि आठ हजार ३१४ कोटी ९१ लाखांचे खेळते भांडवल बँकेत ठेवून पाटील यांचे कामकाज सर्वोत्कृष्ठ ठरले आहे

ठळक मुद्देरशियाची राजधानी मास्को येथे आंतरराष्ट्रीय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानीतसर्वोत्कृष्ट कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरचार हजार ५३९ कोटी २३ लाखांची गुंतवणूक, तीन हजार १३ कोटी २८ लाखाचे कर्ज वाटप,

ठाणे : राज्यभरातील सहकारी बँकांपैकी एकमेव १५९.६३ कोटींचा ढोबळ नफा मिळवून सामाजिक विकासात आघाडीवर असणाऱ्या दि. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेचे अध्यक्ष राजेंद्र गोपाळ पाटील यांना ‘आंतरराष्ट्रीय  आयकॉनीक आॅचिव्हर्स अ‍ॅवार्ड’ या पुरस्काराने मास्को येथील कार्यक्रमात नुकतेच सन्मानीत केले आहे.रशियाची राजधानी मास्को येथे जम्मू काश्मिरचे माजी मंत्री झुल्फीकार अली चौधरी, ताश्कंद येथील ‘एनआयएचए’ विद्यापीठाचे डीन डॉ. ए.आर. नासीर, आंतरराष्ट्रीय आयटी सेलचे मुख्य सुशिलकुमार चर्तुवेदी, मास्कोच्या बिझनेस अलाईड्सचे अध्यक्ष सॅमी कोटवानी, मास्कोच्या आयुर्वेदीक अ‍ॅन्ड मेडिकल कॉलेजच्या मिसेस मारिया आदी आंतरराष्ट्रीय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हा ‘आंतरराष्ट्रीय आयकॉनीक आॅचिव्हर्स अ‍ॅवार्ड’ पाटील यांना सन्मानपूर्वक २९ जून रोजी बहाल करण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत टीडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) भगिरथ भोईर उपस्थित होते. सहकारी बँकांमध्ये सर्वोत्कृष्ट कार्य व सामाजिक पातळीवरील विकासात्मक सर्वोत्कृष्ट कामकाज टीडीसीसी बँकेच्या माध्यमातून पाटील यांनी केली. या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन त्यांना मानाच्या आयकॉनीक आॅचिव्हर्स अ‍ॅवार्ड’ ने सन्मानीत केले आहे.टीडीसीसी बँकेला कृषी क्षेत्रासह सामाजिक, शैक्षणिक आदींसह राज्यभरातील सहकार क्षेत्रातील बँकांमध्ये टीडीसीसी बॅकेला आघाडीवर ठेवून १५९ कोटी ६३ लाखांचा ढोबळ नफा पाटील यांनी कौशल्यपूर्ण कामगिरीने प्राप्त करून दिला. एवढेच नव्हे तर बँकेत सहा हजार ९७८ कोटी १५ लाखांच्या ठेवी, चार हजार ५३९ कोटी २३ लाखांची गुंतवणूक, तीन हजार १३ कोटी २८ लाखाचे कर्ज वाटप, आणि आठ हजार ३१४ कोटी ९१ लाखांचे खेळते भांडवल बँकेत ठेवून पाटील यांचे कामकाज सर्वोत्कृष्ठ ठरले आहे. एवढेच नव्हे तर बँकेचा एनपीए शुन्य टक्के आणि सीआएआर १२.४६ टक्के आहे. बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान होऊन पाटील यांनी अल्पावधीत सर्वोत्कृष्ट कामकाज केल्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन त्यांना ‘आंतरराष्ट्रीय आयकॉनीक आॅचिव्हर्स अ‍ॅवार्ड’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानीत केल्यामुळे त्यांचे देशभरातील व राज्यातील सहकार क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

टॅग्स :thaneठाणेbankबँक