शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्य 100 कोटी, वसुली फक्त 31 कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 00:46 IST

मालमत्ताकर : मोहीम गतिमान करण्याची गरज

सदानंद नाईकलोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाने १०० कोटींचे लक्ष्य ठेवले असताना, डिसेंबरअखेर केवळ ३१ कोटींची वसुली झाल्याची माहिती करनिर्धारक संकलक जेठानंद करमचंदानी यांनी दिली. आता ही मोहीम तीव्र करून २० हजारांपेक्षा जास्त मालमत्ताकर असणाऱ्या मालमत्ताधारकांना वॉरंट बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले.मालमत्ताकरवसुली गतीने होण्यासाठी मालमत्ताकर विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. विभागाचे करनिर्धारक संकलकपद अनेक महिन्यांपासून रिक्त असून अतिरिक्त पदभार जेठानंद करचंदाणी यांच्याकडे दिला आहे. गेल्या महिन्यात करवसुलीत वाढ झाली असली तरी, १०० कोटींचे लक्ष्य मार्चअखेर पूर्ण होणार का, यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. नऊ महिन्यांत फक्त ३१ कोटींची मालमत्ताकरवसुली झाली असून ५०० कोटींपेक्षा जास्त थकबाकी असल्याची माहिती विभागप्रमुखांनी दिली. उपमहापौर भगवान भालेराव यांनी करवसुली झाली, तरच महापालिकेची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली. गेला महिनाअखेर सुटीवर गेलेले आयुक्त डॉ. राजा दयानिधी सोमवारी हजर झाले. त्यांनी सकाळी विभाग अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विकासकामांबाबत सूचना केल्या आहेत.मालमत्ताकर तसेच एलबीटीअंतर्गत मिळणारे शासन अनुदान हे पालिकेचे मुख्य उत्पन्नाचे स्रोत आहेत. कोरोनाकाळात मालमत्ताकरवसुली ठप्प पडल्याने, महापालिकेचा कारभार शासन अनुदानावर सुरू असल्याची टीका मध्यंतरी झाली होती. मात्र, मार्चअखेर १०० कोटींचे लक्ष्य पूर्ण करण्याचा दावा उपायुक्त मदन सोंडे यांनी केला. अनधिकृत बांधकाम नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केल्यास, पालिकेस मोठे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. मात्र, महापालिका प्रशासन याबाबत अनुकूल का नाही, असा प्रश्नही विचारला जात आहे.

मालमत्ताकर विभागासाठी अभय योजना राबवा - गंगोत्रीमालमत्ताकर वसुलीसाठी नागरिकांना भावनिक साद घालण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी मालमत्ताकर वसुलीसाठी जनजागृती अभियान राबविले असल्याचे मत सभागृह नेते भरत गंगोत्री यांनी व्यक्त केले. कोरोनामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. मालमत्ताकर विभागासाठी अभय योजना राबविण्याची शक्यता गंगोत्री यांनी व्यक्त केली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर