शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेलरचालकाची वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 22:30 IST

वाहतूक कोंडी करणा-या चालकाला जाब विचारल्याचा राग आल्याने त्याने वाहतूक पोलीस हवालदार शिवाजी मोरे यांनाच शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार शनिवारी घडला.

ठाणे, दि. 30 - कळवा नाका येथे रस्त्याच्या मधोमध ट्रेलर उभा करून वाहतूक कोंडी करणा-या चालकाला जाब विचारल्याचा राग आल्याने त्याने वाहतूक पोलीस हवालदार शिवाजी मोरे यांनाच शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार शनिवारी घडला. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पसार झालेल्या चालकाचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.कळव्याच्या गॅमन टी जंक्शन येथे 29 जुलै रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास वाहतूक नियंत्रण शाखेचे हवालदार मोरे हे वाहतूक नियमनाचे काम करीत होते. त्याचवेळी एका चालकाने रस्त्याच्या मधोमध ट्रेलर उभा केला. त्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे या चालकाला मोरे यांनी समजविण्याचा प्रयत्न केला. त्याने मात्र त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ करीत त्यांना धक्काबुक्की केली. शासकीय कामातही त्याने अडथळा निर्माण केला. या सर्व धुमश्चक्रीत वाहतूक नियमनासाठी मदत करणारे पोलीसमित्र सुरेश जाधव हेही गाडीच्या धक्क्याने जखमी झाले. या घटनेनंतर या अनोळखी ट्रेलरचालकाने पलायन केले असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश मुघले यांनी सांगितले.