शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

ठामपाची आरोग्ययंत्रणा ऑक्सिजनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:36 IST

ठाणे : ठाणेकरांवर काळजी करण्याची वेळ आता आली आहे, त्याचे कारणही तसेच आहे. मागील काही दिवसांत ठाण्यात कोरोनाचा ...

ठाणे : ठाणेकरांवर काळजी करण्याची वेळ आता आली आहे, त्याचे कारणही तसेच आहे. मागील काही दिवसांत ठाण्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला असून, ही संपूर्ण यंत्रणाच आता ऑक्सिजनवर आली आहे. एकीकडे कोविड सेंटरमध्ये पुरेसा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होण्यास विलंब होत आहे, तर दुसरीकडे बाधितांच्या मृत्यूंची संख्याही वाढत आहे. परंतु, मृतांच्या आकड्यावरूनदेखील संभ्रम निर्माण झाला आहे. त्यात पीपीई किटच्या कमतरेमुळे महापालिकेवर चक्क मृतदेह कचऱ्याच्या पिशवीत बांधण्याची वेळ आली आहे, तर शववाहिनीवर कोविड स्मशानभूमीत काम करणाऱ्यांकडेदेखील पीपीई किट नाहीत. आजही शहरासाठी आवश्यक असलेला रेमडेसिविरचा पुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही.

ठाणे शहरात मार्चपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत रोजच्या रोज पाच पटीने वाढ झाल्याचे दिसत आहे. एप्रिल महिन्यात तर रोजच्या रोज पंधराशे ते अठराशे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या ग्लोबल आणि पार्किंग प्लाझा येथील कोविड सेंटरवरील ताण वाढला असून, येथे बेड मिळणेदेखील मुश्कील झाले आहे. त्यात आता या रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांना आणि खासगी रुग्णालयांनादेखील ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही तर महापालिकेची यंत्रणा व्हेंटिलेटरवर आल्याशिवाय राहणार नाही. ठाणे महापालिकेला आता १५० मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे. परंतु, मागणीप्रमाणे १५ ते २० टक्के पुरवठा कमी होत आहे. त्यातही मागील १० ते १२ दिवसांत ऑक्सिजनचा वापर दुपटीने वाढला आहे. त्यामुळेच आता शहरात ऑक्सिजनचा तुटवडा झाला आहे. एकीकडे रेमडेसिविरचा तुटवडा असताना दुसरीकडे महापालिकेच्याच कोविड सेंटरमधून रेमडेसिविरचा काळा बाजार होत असल्याची बाब समोर आली असून, त्याचा तपास आता पोलीस करीत आहेत. त्यातही महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये सध्या अपुरा रेमडेसिविरचा साठा असल्याने त्यांनी खासगी रुग्णालयांना आपल्याकडील साठा देण्यास हात आखडता घेतला आहे.

आता मागील काही दिवसांत बाधित रुग्णांबरोबरच मृतांचा आकडादेखील वाढू लागला आहे. एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या नातेवाइकांना तासन‌्तास ताटकळत स्मशानभूमीत राहावे लागत आहे. सोमवारीदेखील ग्लोबल रुग्णालयात १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यातही मृतदेह चक्क कचऱ्याच्या पिशवीत बांधण्याची धक्कादायक घटनादेखील समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेकडे आता पीपीई किटचीदेखील कमतरता असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे आता महापालिका मृतांचा आकडा लपवित असल्याचे दिसत आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून जाहीर होणाऱ्या आकडेवारीत आणि महापालिका जाहीर करीत असलेल्या आकडेवारीतदेखील तफावत आढळली आहे. त्यातही हे मृतदेह स्मशानभूमीपर्यत नेणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे पीपीई किट नसल्याचे दिसून आले आहे. तसेच कोविड स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेदेखील पीपीई किटची वानवा आहे. त्यामुळे आपल्या जिवाची पर्वा न करता हे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीवही यामुळे टांगणीला लागला आहे. एकूणच आता शहराची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली असून, महापालिका प्रशासनावरदेखील यामुळे ताण वाढू लागला आहे. त्यामुळेच आता सध्याची परिस्थिती पाहिली तर महापालिकेची आरोग्य यंत्रणाच ऑक्सिजनवर आल्याचे दिसत आहे.