शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बोलण्यात गुुंतवत ५१ हजारांचे मोबाइल लांबवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:49 IST

कल्याणच्या कारचालकाला धक्का लागल्याची बतावणी करून बोलण्यात गुुंतवून त्याच्याकडून ५१ हजारचे दोन मोबाइल लुबाडल्याचा प्रकार सोमवारी माजीवडा पुलाजवळ घडला

ठाणे : कल्याणच्या कारचालकाला धक्का लागल्याची बतावणी करून बोलण्यात गुुंतवून त्याच्याकडून ५१ हजारचे दोन मोबाइल लुबाडल्याचा प्रकार सोमवारी माजीवडा पुलाजवळ घडला. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कल्याण पूर्व भागातील चिंचपाडा येथील रहिवासी सुशील सिंह हे १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कल्याण येथून मुंबई नाशिक हायवे मार्गाने मुलूंड येथे पत्नी आणि मुलाला घेण्यासाठी जात होते. सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ते माजीवडा पुलाच्या बाजूला असलेल्या सिग्नलवर थांबले असता, अचानक त्यांच्या कारच्या डाव्या बाजूला पुढील दरवाजाजवळ एक भामटा आला. त्याने शिवीगाळ करून दरवाजाची काच त्यांना खाली घेण्यास भाग पाडले. नंतर ‘कोणत्या धुंदीत गाडी चालविता, तुमच्यामुळे एक व्यक्ती गाडीखाली आली असती’, असे सांगून त्यांना बोलण्यात गुंतविले. त्यानंतर दुसºया बाजूने आलेल्या व्यक्तिनेही त्यांना शिवीगाळ करून दरवाजाची काच खाली करण्यास भाग पाडले. त्याचवेळी डाव्या बाजूला असलेल्या व्यक्तीने पुन्हा शिवीगाळ करून त्यांचे लक्ष विचलित करून तिथून पळ काढला. यामुळे प्रचंड भेदरलेल्या सिंह यांनी पोलिसांना कळवण्यासाठी मोबाइल शोधले. तेव्हा त्यांचे ५१ हजारांचे दोन्ही मोबाइल गायब झाले होते. या दोघांविरुद्ध त्यांनी कापूरबावडी ठाण्यात फसवणूक आणि शिवीगाळीची तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक एस. ए. देशमुख तपास करीत आहेत.