शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांना नोटीस देऊन कारवाई, बेकायदा बांधकामांना दुरुस्ती परवानगी; प्रकरणांची होणार चौकशी 

By धीरज परब | Updated: January 4, 2024 19:17 IST

विशेष म्हणजे  शासनाने बदली करून देखील तब्बल १ वर्ष बच्छाव हे मीरा भाईंदर महापालिकेत ठाण मांडून होते . 

मीरारोड -  अनधिकृत बांधकामां वर कारवाई आणि नंतर नियमबाह्य दुरुस्ती परवानग्या देणे व अनेक अनधिकृत बांधकामांना नोटीस देऊन कारवाई न केल्या बद्दल तत्कालीन सहायक आयुक्त सचिन बच्छाव यांच्या कारभाराची  चौकशी साठी आयुक्त संजय काटकर यांनी दोघं अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली आहे. विशेष म्हणजे  शासनाने बदली करून देखील तब्बल १ वर्ष बच्छाव हे मीरा भाईंदर महापालिकेत ठाण मांडून होते . 

मुख्याधिकारी गट-ब संवर्गातील सचिन काशिनाथ बच्छाव यांना "परिविक्षाधीन प्रशिक्षणार्थी" म्हणून सहाय्यक आयुक्त या पदावर मीरा भाईंदर महानगरपालिकेत १० फेब्रुवारी २०२० रोजी नियुक्त केले होते . बच्छाव यांना प्रभाग अधिकारी पासून अन्य अनेक अर्थपूर्ण विभाग देण्यात आले .  

शासनाने २६ जून २०२२ रोजी बच्छाव यांची ठाणे महानगरपालिकेत बदली केली . परंतु बच्छाव हे तेथे हजर झाले नाहीच उलट सुमारे १३ महिने ते मीरा भाईंदर महापालिकेतच कार्यरत राहिले . १२ जुलै २०२३ रोजी शासनाने त्यांची बदली सहाय्य्क आयुक्त, गट-ब, नगरपरिषद संचनालय, नवी मुंबई येथे केले . मात्र तेथे सुद्धा सप्टेंबर पर्यंत ते रुजू झाले नाहीत . 

१० फेब्रुवारी २०२० च्या शासन आदेश नुसार परिविक्षाधीन मुख्याधिकारी गट-ब ह्यांचे वेतन व भत्ते हे आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचनालय, वरळी, मुंबई ह्यांच्या आस्थापनेवर निर्माण करण्यात आलेल्या अधिसंख्य पदावरूनच काढण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत या अधिकाऱ्यांचे वेतन व भत्ते ते जेथे कार्यरत आहेत, त्या कार्यालयातून अदा करण्यात येऊ नये असे स्पष्ट असताना देखील बच्छाव यांना मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरून  १५ लाख १९ हजार इतके वेतन , भत्ते दिले गेले . 

त्यात कहर म्हणजे प्रभाग समिती क्र. ६ चे प्रभाग अधिकारी असताना बच्छाव ह्यांनी अनेक अनधिकृत बांधकाम धारकांना नोटीस बजावल्या. मात्र अनेक नोटीस बद्दलची कागदपत्रे हि पालिका कर्यालयात सापडतच नाहीत . सध्याचे प्रभाग अधिकारीप्रभाकर म्हात्रे यांनी पूर्वीचे संबंधित कनिष्ठ अभियंता शुभम पाटील व संजय सोनी यांना त्या बद्दल लेखी पत्र दिले आहे . 

अनधिकृत बांधकामांना नोटीस बजावल्यानंतर कायदेशीर कारवाई करून अंतिम निर्णय घेणे बंधनकारक असून सुद्धा अनेक प्रकरणी सचिन बच्छाव ह्यांनी अनेकांना फक्त नोटीस देत पुढे कारवाई केलीच नाही . एमआरटीपी नुसार गुन्हे दाखल केले नाहीत . काही प्रकरणात बच्छाव ह्यांनी नोटीस बजावल्या , काही अनधिकृत बांधकामे तोडली त्यांनाच दुरुस्ती परवानगी दिली.

आमदार गीता जैन , माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्णा गुप्ता यांनी बच्छाव विरोधात तक्रारी केल्या होत्या . तक्रारदारांनी आयुक्त काटकर यांच्या कडे पाठपुरावा चालवला होता . अखेर आयुक्तांनी ३ जानेवारी रोजी आदेश काढून बच्छाव यांच्या विरोधातील तक्रारींच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर व नगररचनाकार सुजित पानसरे यांची द्विसदस्य चौकशी समिती नेमली आहे . 

आयुक्तांच्या पत्रात , आमदार गीता जैन यांनी केलेल्या तक्रारी नुसार बच्छाव यांनी २२ अनधिकृत बांधकामांना नोटिसा दिल्या होत्या त्यावर कार्यवाहीची माहिती तसेच गुप्ता यांच्या तक्रारी नुसार अनधिकृत बांधकामे तोडल्यावर त्याच बांधकामांना संरक्षण देण्यासाठी बेकायदेशीरपणे दुरुस्ती परवानगी देऊन अनियमितता व भ्रष्टाचार केल्याचे नमूद आहे . 

तक्ररीच्या अनुषंगाने व अन्य प्रकरणांची स्थळपाहणी करून संयुक्तपणे सखोल चौकशी करावी . स्वयंस्पष्ट अभिप्रायां सह ७ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी समितीला दिले आहेत . त्यामुळे समितीच्या अहवाला कडे लक्ष लागले असून बच्छाव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे .