शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांवर कठोर कारवाई करा

By admin | Updated: February 15, 2017 04:32 IST

पाणीपट्टी व मालमत्ताकराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी थकबाकीदारांवर कठोर कारवाई करा, असा आदेश केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन

कल्याण : पाणीपट्टी व मालमत्ताकराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी थकबाकीदारांवर कठोर कारवाई करा, असा आदेश केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी सोमवारी साप्ताहिक आढावा बैठकीत पाणीपुरवठा, करनिर्धारक संकलक आणि प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिला. या बैठकीत पाणीबिलापोटी आतापर्यंत झालेल्या वसुलीची माहिती आयुक्तांनी घेतली. या वेळी त्यांनी थकबाकीदारांची नळजोडणी खंडित करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला दिल्या. २०१६-१७ च्या अंदाजपत्रकानुसार कर, पाणीपुरवठा आणि नगररचना विभाग यांना करवसुलीची उद्दिष्टे देण्यात आली आहेत. परंतु, जानेवारी २०१७ अखेर दिलेले उद्दिष्ट न गाठल्यामुळे महापालिकेतील सर्व विभागीय उपायुक्तांसह करनिर्धारक संकलक, प्रभाग अधिकारी, संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जानेवारीचे वेतन अदा करू नये, असा आदेश रवींद्रन यांनी नुकताच दिला होता. मार्च जसजसा जवळ येतो, तसतशी पालिकेची करवसुली मोहीम जोरात सुरू होते. परंतु, जानेवारीत ठरवलेले उद्दिष्ट गाठता न आल्याने एकंदरीतच वार्षिक उद्दिष्टावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यंदाच्या वर्षी महापालिकेने करवसुलीपोटी सुमारे ३५० कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत २२३ कोटी २७ लाखांची वसुली केली आहे. मालमत्तांसह उर्वरित उत्पन्नाच्या स्रोतांचीही तीच परिस्थिती आहे. करवसुली थंडावल्याप्रकरणी आयुक्तांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांचे वेतन रोखण्याचा आदेश दिला असताना सोमवारच्या आढावा बैठकीतही त्यांनी करवसुलीची माहिती घेतली. मालमत्तावसुलीचा आढावा घेताना आयुक्तांनी प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना अधिक जोमाने मालमत्ता कराच्या वसुलीचे आदेश दिले. थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करा, नळजोडण्याही खंडित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. (प्रतिनिधी)