शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

मीरा भाईंदर मधील धोकादायक इमारतींवर पावसाळ्या आधी कारवाई करा, अन्यथा अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

By धीरज परब | Updated: April 10, 2023 18:46 IST

सोमवार १० एप्रिल रोजी आयुक्त ढोले यांनी शहरातील धोकादाय इमारतींचा आढावा व कारवाई बाबत आयुक्त दालनात बैठक घेतली .

मीरारोड - मीरा भाईंदर शहरातील धोकादायक इमारती पडून दुर्घटना होणार नाही यासाठी पावसाळ्या आधी कारवाई करा अन्यथा संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल असा इशारा महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी प्रभाग अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला आहे . 

सोमवार १० एप्रिल रोजी आयुक्त ढोले यांनी शहरातील धोकादाय इमारतींचा आढावा व कारवाई बाबत आयुक्त दालनात बैठक घेतली . बैठकीस उपायुक्त मारुती गायकवाड, अतिक्रमण विभागप्रमुख नरेंद्र चव्हाण, प्रभाग अधिकारी प्रभाकर म्हात्रे , योगेश गुणीजन , कांचन गायकवाड , सचिन बच्छाव , स्वप्नील सावंत आदी उपस्थित होते .

बैठकीत शहरातील धोकादायक इमारतीबाबत चर्चा केली .  सर्व धोकादायक इमारतींना तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी नोटीस बजावण्याचे निर्देश आयुक्त यांनी सर्व प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांना दिले . जिथे शक्य असेल त्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट हे महानगरपालिकेच्या फंडातून करा . 

स्ट्रक्चरल ऑडीट अहवालानुसार धोकादायक असलेल्या बांधकामांवर न्यायालयाचे आदेश तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पावसाळ्यापूर्वी कारवाई करा .  कामात कुचराई, हलगर्जीपणा वा दुर्लक्ष केल्यास खपवून घेतले जाणार नाही . धोकादायक इमारतीवर वेळीच कारवाई न झाल्याने काही अनुचित घटना घडून जिवीत व वित्तहानी झाल्यास सबंधित अधिकाऱ्यास जबाबदार ठरवले जाणार अशी ताकीद आयुक्त ढोले यांनी अधिकाऱ्यांना दिली.