शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नगरसेवकावर कारवाई व्हावी, चित्रा वाघ यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 02:46 IST

पत्नीला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या शिवसेना नगरसेवक गणेश कांबळे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे.

ठाणे : पत्नीला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या शिवसेना नगरसेवक गणेश कांबळे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरुवारी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी कारवाई करण्याचे आदेश कळवा पोलिसांना दिल्याची माहिती वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली.ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत गणेश कांबळे हे कळवा परिसरात शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. ते कळव्यातील महात्मा फुलेनगर परिसरात राहतात. गत दोन वर्षांपासून ते घरगुती कारणांवरून आपल्याला मारहाण करत असल्याची तक्रार त्यांची पत्नी कॅरलिन यांनी कळवा पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी त्यांच्याकडे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि विवाह प्रमाणपत्राची मागणी केली. यासंदर्भात वाघ यांनी बुधवारी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा करिना दयालानी, अ‍ॅड. वंदना जाधव आणि कॅरलिन कांबळे आदी उपस्थित होते.सरकारी जमिनी हडप करून त्यावर बेकायदेशीर बांधकामे गणेश कांबळे यांनी केली असल्याचा आरोप वाघ यांनी यावेळी केला. त्याविषयीचे पुरावे पोलीस आयुक्तांना दिले असून गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता कांबळे यांना तडीपार करण्याची मागणी केली असल्याचे वाघ यांनी सांगितले. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे असून एका गुन्ह्यात कॅरलिना हिनेच त्यांचा जामीन घेतला आहे. आपल्या गैरकृत्यांची माहिती कॅरलिनाला असल्यामुळे तो तिला मारझोड करायचा, असा आरोप आरोप वाघ यांनी केला. यासंदर्भात विधिमंडळ अधिवेशनामध्ये आवाज उठवणार असल्याचे वाघ यांनी सांगितले.दरम्यान, राज्य राखीव दलाचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी केलेल्या महिला पोलिसांच्या छळाबाबतही आपण पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितांचे समुपदेशन करावे, अशी मागणी आपण केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यासंदर्भात गणेश कांबळे यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, ते एका बैठकीमध्ये व्यस्त असल्याची माहिती त्यांच्या सहकाºयाने दिली.>महिला आयोग आहे का?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असून रणजित पाटील आणि दीपक केसरकर असे दोन गृहराज्यमंत्री आहेत. राज्यात महिला अत्याचाराचे गुन्हे घडत असताना गृह विभाग दखल घेताना दिसत नाही.मुंबईला खेटून असलेल्या ठाण्यातील या प्रकरणामध्येही तेच पाहायला मिळत असल्याची टीका चित्रा वाघ यांनी पत्रकारांशी बोलताना केली. महिला आयोगाच्या अध्यक्षा मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामांची माहिती देण्यात व्यस्त आहेत.त्यामुळे त्यांना अशा प्रकरणाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याने राज्यात महिला आयोग अस्तित्वात आहे का, असा बोचरा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.