शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

टीजेएसबीमध्ये जमा झाले शिक्षकांचे पगार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 22:32 IST

ठाणे, दि. 30 - एकीकडे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शिक्षकांचे पगार आपल्याच बँकेतून होण्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी राज्य शासनाला साकडे घातले असतानाच आता ठाणे जनता सहकारी बँकेत (टीजेएसबी) शिक्षकांचे पगार १ तारखेपूर्वीच जमा झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे न्यायालयाने जरी कोणत्या बँकेत शिक्षकांनी खाती उघडावीत याची सक्ती नसावी, ...

ठाणे, दि. 30 - एकीकडे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शिक्षकांचे पगार आपल्याच बँकेतून होण्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी राज्य शासनाला साकडे घातले असतानाच आता ठाणे जनता सहकारी बँकेत (टीजेएसबी) शिक्षकांचे पगार १ तारखेपूर्वीच जमा झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे न्यायालयाने जरी कोणत्या बँकेत शिक्षकांनी खाती उघडावीत याची सक्ती नसावी, असा आदेश दिला असला तरी टीजेएसबीतून पगार होण्यासाठी राज्य शासनाकडून चाललेला आटापिटा पाहता शिक्षक मात्र अजूनही संभ्रमात आहेत.गेल्या ४० वर्षांपासून ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसी) बँकेत जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांचे पगार विनाअडथळा होत आहेत. या वेतपापोटी थकीत असलेले सुमारे पाच कोटींचे कमिशनही बँकेने काही वर्षांपूर्वीच माफ केले आहे. गेल्या १२ वर्षांपासून कोणत्याही मोबदल्याविना सुमारे २० हजार शिक्षकांचे ७० कोटींचे पगार या बँकेतूनच होत आहेत. आता अचानक राज्य शासनाच्या परिपत्रकामुळे शिक्षकांना टीजेएसबीमध्ये खाती उघडण्यास भाग पाडून तिकडे वेतन करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे १४ हजार ५०० शिक्षकांनी टीजेएसबी बॅकेत खाती उघडली. त्यामुळे आता ज्या शाळांनी टीजेएसबीच्या नावे पगाराचे विवरण पत्र (पे बिल) शासनाकडे सुपूर्द केले होेते, त्यांचे धनादेश शासनाकडून मिळाल्यावर अवघ्या २४ तासांमध्ये त्या शाळांमधील सर्व शिक्षकांच्या टीजेएसबीच्या खात्यात पगार जमा केल्याचा दावा टीजेएसबीचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे यांनी केला आहे. तसेच वेतन खात्यात जमा होण्यापूर्वीच शिक्षकांना त्यांचे एटीएम कार्ड आणि चेकबुकही व्यक्तिश: देण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.दरम्यान, टीजेएसबी बँकेत जरी १४ हजार ५०० शिक्षकांनी खाती उघडली असली तरी त्यांच्यासह २० हजार शिक्षकांची खाती ही टीडीसी मध्येच आहेत. शिवाय, त्यांच्यावर सक्ती करण्यात येऊ नये असे मुंबई उच्च न्यायालयानेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन येत्या काही दिवसांमध्ये टीडीसी बँकेतच पूर्वीप्रमाणे होईल, असा दावा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगिरीथ भोईर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.