शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

भिवंडीतील बेकायदा बांधकामांकडे यंत्रणांची डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 01:21 IST

उदासीनतेचे नागरिक ठरतात बळी

- नितीन पंडीतभिवंडी : शहरातील धामणकर नाका परिसरात असलेली जिलानी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३८ जणांचा मृत्यू तर २५ जण जखमी झाले. यापूर्वीही शहरात धोकादायक व बेकायदा इमारती कोसळून नागरिकांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, मनपा प्रशासनासह संबंधित जबाबदार अधिकारी या बांधकामांकडे दुर्लक्ष का करतात, असा सवाल उपस्थित होत आहे. जिलानी इमारत दुर्घटना ताजी असतानाच आता भिवंडीतील ग्रामीण भागात गोदामाची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाल्याची घटना मागील आठवड्यात दापोडा ग्रामपंचायत हद्दीत घडली. या घटनेने तालुक्यातील बेकायदा गोदामांच्या बांधकामांचा प्रश्नही पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मात्र, या बेकायदा गोदामांना नेमका वरदहस्त कुणाचा, याचा शोध घेण्यास पोलीस, महसूल प्रशासन आजही हतबल झाले आहे.तालुक्यात सुमारे ६० गावांमध्ये एमएमआरडीए प्राधिकरण मागील दहा ते बारा वर्षांपासून लागू झाले आहे. मात्र, या प्राधिकरणाकडून बांधकामांबाबत कोणतीही ठोस भूमिका नसल्याने आजही नागरिक बांधकाम परवानगीबाबत फारसे जागरुक नाहीत. त्यातूनच स्थानिक नेत्यांना हाताशी धरून स्थानिक ग्रामपंचायतींच्या ना-हरकत दाखल्यावरच अनेक गोदाम बांधकामे उभी राहत आहेत. एमएमआरडीए प्राधिकरणाच्या जाचक अटी व त्यातून होणारी आर्थिक लूट या सर्वांमुळे अनेक बांधकाम व्यावसायिक स्थानिक नेत्यांना हाताशी धरून बेकायदा बांधकाम करण्यात धन्यता मानतात. मात्र, जेव्हा एखादी दुर्घटना घडून त्यात नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो, त्यावेळेस या बेकायदा बांधकामांची चर्चा रंगते. त्यानंतर काही दिवसांनंतर ही चर्चा तशीच थांबते व पुन्हा बांधकामे शहर व ग्रामीण भागात उभी राहतात. यंत्रमाग व्यवसायामुळे कापड उद्योगाचे मँचेस्टर त्याचबरोबर गोदाम उद्योगाची नगरी म्हणून भिवंडीची ओळख आहे.बेकायदा बांधकाम असल्याने बांधकाम व्यावसायिक बांधकामाचा दर्जा व गुणवत्तेकडे दुर्लक्ष करीत असल्याने बांधकामे निकृष्ट दर्जाची होतात. निकृष्ट बांधकामांमुळे ठिकठिकाणी इमारती कोसळून नागरिकांना जीवाला मुकावे लागते.दुसरीकडे पालिका प्रशासन व एमएमआरडीए प्राधिकरण संबंधित बांधकामांना केवळ नोटिसा बजावून आपले हात वर करतात. मात्र, अशी बांधकामे कोसळून त्यात मृत्यू पडलेल्यांची जबाबदारी कोणाची हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो. पोलीस प्रशासन बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकांसह गोदाम व इमारती मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम करतात, मात्र या बांधकामांना पाठीशी घालणाऱ्यांवर कधी कारवाईचा बडगा उगारण्यात येणार? जर कारवाई केली तर अशा बांधकामांना थोड्याफार प्रमाणात आळा बसण्यास मदत होईल. आर्थिक फायदा पाहून अशी बांधकामे उभी राहतात व सामान्यांचा नाहक बळी जातो.  या बांधकामांना सुविधा देणे चुकीचे आहे.कवडीमोल भावाने विकत घेतल्या जमिनीअशिक्षितपणामुळे येथील ग्रामीण भागातील नागरिकांना कायदा व बांधकामाविषयी फारशी माहिती नसल्याने अनेक गोदाम बांधकाम व्यावसायिकांनी कवडीमोल भावाने येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या व त्यावर गोदामे बांधली. विकासाच्या नावाने शेतकऱ्यांना जी गोदामे देण्यात आली ती अनेक गोदामे बहुधा निकृष्ट दर्जाची असल्याची बाब समोर येत आहे. मात्र, चाणाक्ष गोदाम व्यावसायिकांनी आपल्या हिश्श्याची गोदामे विकून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा करून येथून पळही काढला आहे. येथील बेकायदा बांधकामांवर कारवाई व्हावी, असे निर्देश खुद्द मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेच्या निकालात दिले आहेत. मात्र, आजही त्याकडे एमएमआरडीए व महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.