शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सवरांचा डम्पर पैसा हानाया जाय!

By admin | Updated: July 28, 2016 03:38 IST

टोपलीत पापड्या कडाडविल्या, पालकमंत्र्यांच्या तडाडविल्या, कसाट्याची पाटी लवत जाय, विष्णू सवरांचा डम्पर पैसा हानाया जाय, वनगाचा डम्पर खाली कराया जाय

भिवंडी : टोपलीत पापड्या कडाडविल्या, पालकमंत्र्यांच्या तडाडविल्या, कसाट्याची पाटी लवत जाय, विष्णू सवरांचा डम्पर पैसा हानाया जाय, वनगाचा डम्पर खाली कराया जाय, पालघरला खाली कराया जाय...अशा खास आदिवासी गाण्यांची बरसात भिवंडीत झाली. स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी विक्रमगडहून विधानभवनावर निघालेल्या आदिवासीबांधवांनी भिवंडीतील गाजेंगी हॉलमध्ये मंगळवारी रात्री ठेका धरला.आदिवासीबांधव दिवसभर काम केल्यानंतर शीण घालवण्यासाठी आपल्या वस्तीत गाणी म्हणतात. मात्र, येथे त्यांना वाजवण्याकरिता ढोल नसल्याने चक्क प्लास्टिकच्या बादलीवर ठेका धरला.आदिवासीबांधवांच्या विकासासाठी सरकारने ठाणे जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांचा समावेश करत पालघर जिल्हा वेगळा केला. तर, जव्हार तालुक्याच्या विकासासाठी विक्रमगड ग्रामपंचायत वेगळी केली. मात्र, यानंतरही परिसरातील आदिवासींचा विकास झाला का, हा प्रश्न आदिवासी नागरिकांना भेडसावत आहे.आदिवासी ग्रामपंचायतीचा दर्जा असलेल्या विक्रमगड ग्रामपंचायतीला चिमूटभर बिगर आदिवासींच्या मागणीनुसार सरकारने विक्रमगड नगरपंचायत म्हणून जाहीर केले. या नगरपंचायतीचे आर्थिक पडसाद सोसावे लागू नये तसेच सरकारी योजनेपासून वंचित राहू नये म्हणून विक्रमगड ग्रुपग्रामपंचायतीतील यशवंतनगर व वाकडूपाडा या गावपाड्यांतील आदिवासीबांधवांनी विरोध केला. यशवंतनगर या गावात नऊ तर वाकडूपाड्यामध्ये सात पाडे आहेत. या दोन्ही गावपाड्यांचा नगरपंचायतीत समावेश करू नये, म्हणून वाकडूपाडा कृती समिती व यशवंतनगर स्वतंत्र ग्रामपंचायत कृती समिती स्थापन केली. स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी विक्रमगड ते विधानभवन असा लाँगमार्च रविवारपासून सुरू केला. या लाँगमार्चमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सहभागी झाले. हे आदिवासी शहरातील गाजेंगी हॉलमध्ये रात्रभर थांबून त्यांनी बुधवारी सकाळी नारपोलीमार्गे ठाणे-मुंबईच्या दिशेने निघाले. (प्रतिनिधी)अंथरण्यासाठी प्लास्टिकचा वापरआदिवासीबांधवांनी पावसापासून बचावासाठी अंगावर घेतलेले प्लास्टिक कापड जमिनीवर अंथरले आणि त्यावर ते झोपले होते.पालखीत संविधानाची प्रतआंदोलनकारी आदिवासींनी न्याय मागण्यासाठी पालखीत संविधानाची प्रत ठेवून कायद्याची पालखी वाहिली.आजही संघर्ष सुरूच वयोवृद्ध शंकर भोये यांनी भूमिपुत्रांना ग्राम पंचायतीसाठी आजही संघर्ष करावा लागत आहे, असे सांगत खंत व्यक्त केली.सवरांना निवेदन देऊनही फायदा नाहीवाकडूपाडा व यशवंतनगर या दोन्ही गावांच्या स्वतंत्र ग्रामपंचायती करण्याच्या निमित्ताने पालकमंत्री विष्णू सवरा यांना निवेदने देऊनही त्याची दखल त्यांनी घेतली नाही,असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.आंदोलनात एमबीए झालेली तरुणीया आंदोलनात एमबीए झालेली आदिवासी तरुणी दीपाली श्रीधर पऱ्हाडे हिने आपला लढा आदिवासीबांधवांकरिता असल्याचे सांगितले. त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करणार असल्याचे ती म्हणाली.