शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात दोन माकडांचा संशयास्पद मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 18:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : वागळे इस्टेट, रामनगर येथे दोन जंगली माकडांचा मृत्यु वीजेच्या धक्याने की अल्पवयीन मुलांच्या मारहाणीतून ...

ठळक मुद्देमृतदेह परस्पर दफन केल्याने गूढ वाढलेमारहाण झाल्याचाही संशय

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वागळे इस्टेट, रामनगर येथे दोन जंगली माकडांचा मृत्यु वीजेच्या धक्याने की अल्पवयीन मुलांच्या मारहाणीतून झाला, याबाबत अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. दोघांचेही मृतदेह परस्पर जंगलात पुरण्यात आले होते. ठाणेवनविभागाने ते काढून पुन्हा शवविच्छेदनासाठी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय  उद्यानातील पशुवैद्यकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाण्याच्या वागळे इस्टेट रोड क्रमांक २८ येथील मॅक्स स्पेर कंपनीसमोर दोन जंगली माकडांचा विद्युत खांबावर चढल्याने वीजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला सोमवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानुसार या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेंव्हा त्या माकडांना तेथील स्थानिक अज्ञात मुलांनी जवळच्या डोंगरावर नेऊन दफन केल्याची माहिती समोर आली. ही माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख संतोष कदम यांनी वनविभागाला दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दफन केलेल्या दोन्ही माकडांनार बाहेर काढून ठाण्यातील एसपीसीए या संस्थेच्या पशुवैद्यकीय रु ग्णालयात नेले. तपासणीत त्या माकडांना मारहाण झाल्याची प्राथमिक बाब समोर आली. त्यामुळे नेमकी या माकडांचा मृत्यु मारहाणीतून झाला की वीजेच्या धक्क्याने याचा तपास आता वनविभागाकडून करण्यात येत आहे. दोन्ही माकडांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी बोरिवली येथील वनविभागाच्या पशुवैद्यकीयरु ग्णालयात करण्यात येणार आहे. या तपासणी अहवालानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य राहील असे वनविभागाने सांगितले.

‘‘रुग्णालयात आणण्याआधीच त्यांचा मृत्यु झाला होता. त्यांना पुरलेही होते. परंतू त्यांना वीजेच्या धक्का लागल्याचे निशाण नव्हते. त्यामुळे मृत्युचे नेमकी कारण सांगता येणार नाही.’’डॉ. संजय राणे, मानद पशुवैद्यक, एसपीसीए, ठाणे.‘‘ घटनास्थळी जाण्यापूर्वीच दोन्ही माकडांना जमिनीत पुरले होते. मृत्युचे नेमकी कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल.’’संजय पवार, वनपाल, ठाणे शहर.........

* नर जातीच्या खांद्याला दुखापतदोन्ही माकडे वानर जातीचे असून त्यातील एक नर तर दुसरे मादी आहे. नराच्या डाव्या खांद्याला दुखापत झाल्याची माहिती तपासणी करणाºया डॉक्टरांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेMonkeyमाकडforest departmentवनविभाग