शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पाणी जोडणीच्या वाढीव दराला स्थगिती

By admin | Updated: May 25, 2017 00:07 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भांडवली अंशदान दर लागू करण्याच्या निर्णयाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भांडवली अंशदान दर लागू करण्याच्या निर्णयाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. या भांडवली अंशदानामुळे नवीन नळ जोडणीसाठी प्रति सदनिका २७ हजारापर्यंत दर आकारला जाणार होता. त्यामुळे त्याचा थेट फटका हा सदनिका खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बसणार होता. या वाढीव दराला पाणीपुरवठा मंत्र्यांनीच स्थगिती दिली आहे. त्यामुळे तूर्त ही दरवाढ मागे घेण्यात आली आहे. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत आमदार किसन कथोरे यांनी प्राधिकरणाची भांडवली अंशदान वर्गणी बंद करावी तसेच दीड वर्षापासून बंद असलेल्या नळजोडण्या देण्याची प्रक्रि या पुन्हा सुरु करावी, अशी मागणी केली. त्यावर पाणीपुरवठा मंत्र्यांनी भांडवली अंशदान वर्गणीला तातडीने स्थिगती देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. तसेच दीड वर्षापासून बंद असलेल्या नवीन नळजोडण्या देण्याची प्रक्रि या तातडीने सुरु करण्याचे व नागरिकांनी काही नळजोडण्या घेतल्या असल्यास त्यांना कायदेशीर करण्याचे आदेश दिले. या नळ जोडण्यांना मीटरप्रमाणे बिल पाठवावे तोपर्यंत या नळजोडण्या तोडण्याबाबत कोणतीही कार्यवाही करू नये, असेही आदेश लोणकर तसेच राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. प्राधिकरणाने अलिकडेच जारी केलेल्या परिपत्रकानुसार, भांडवली अंशदान दर लागू केले होेते. या पार्श्वभूमीवर कथोरे यांनी भांडवली अंशदान दर रद्द करण्याची मागणी केली होती. आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्ष वामन म्हात्रे, संभाजी शिंदे, किरण भोईर, संजय भोईर, राम पातकर, मुख्याधिकारी देविदास पवार उपस्थित होते.