शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

आंदोलनाचा इशारा देणा-या चालकाचे निलंबन, आकसापोटी कारवाई : कल्याण बस डेपोचा भोंगळ कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:52 IST

कल्याण बस डेपोतील चालक आणि वाहकांचे कामाचे तास कापल्याप्रकरणी दाद मागण्यासाठी मनसे राज्य परिवहन कामगार सेनेतर्फे आंदोलनाचा इशारा देणारे

कल्याण : कल्याण बस डेपोतील चालक आणि वाहकांचे कामाचे तास कापल्याप्रकरणी दाद मागण्यासाठी मनसे राज्य परिवहन कामगार सेनेतर्फे आंदोलनाचा इशारा देणारे चालक महादेव म्हस्के यांच्याविरोधात कल्याण डेपो व्यवस्थापकांनी निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे अन्य चालकवाहकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी आहे.कामाचे तास भरूनही काही वाहक व चालकांचे कामाचे तास कापण्यात आले होते. याप्रकरणी मनसे राज्य परिवहन कामगार सेनेने कल्याण डेपो प्रशासनाला निवेदन दिले होते. ही कारवाई प्रशासनाने मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यासाठी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर व महिलाध्यक्ष ऊर्मिला तांबे यांनी डेपो व्यवस्थापकांची २७ सप्टेंबरला भेट घेतली. या वेळी चर्चेसाठी म्हस्के आणि पोलीसही उपस्थित होते. त्यानंतर, डेपो व्यवस्थापनाने म्हस्के यांना ८ आॅक्टोबरला निलंबित केले आहे. डेपो व्यवस्थापनाला धमकावल्याचे निलंबन पत्रात म्हटले आहे. पोलीस बंदोबस्तात चर्चा सुरू असताना धमकावण्याचा आरोप कितपत योग्य आहे, असा मुद्दा म्हस्के यांनी उपस्थित केला आहे.गरोदर व आजारी महिला वाहकांना लांब पल्ल्यांच्या गाडीवर ड्युटी लावली जाते. खराब, खड्डेमय रस्ते व पावसामुळे फेºया कमी झाल्या. त्यासाठीही चालक व वाहकांना जबाबदार धरले होते. तेव्हाही चालकवाहकांना नोटिसा पाठवल्या होत्या. तेव्हा म्हस्के यांनी संघटनेद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता. तेव्हा म्हस्के यांची वाडा बस स्थानकात बदली करण्यात आली. तेव्हा मनसेने डेपो व्यवस्थापकाची भेट घेतली. जिल्हा नियंत्रकांनी म्हस्के यांच्याविरोधातील कारवाई मागे घेतली होती. पुन्हा आंदोलनाचा इशारा देणे त्यांना महागात पडले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण