शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

डॉ. योगेश शर्मा आणि डॉ. सुचितकुमार कामखेडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई

By अजित मांडके | Updated: March 4, 2023 21:04 IST

डॉक्टरांना चांगल्या सोई सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही रुग्णालय प्रशासनाची असतांनाही त्याकडे कानाडोळा किंवा दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले होते.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा यांच्यावर ठाणे महापालिकेने निंलबनाची कारवाई केली आहे. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रुग्णालयातील नवीन प्रसूतीगृह, वाचनालय आदींचे लोकार्पण केले. यावेळी शिकाऊ डॉक्टरांच्या हॉस्टेलमध्ये सुविधा मिळत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे असुविधा देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली.

मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अंतर्गत शहरातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपुजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूतीगृहासह वाचनालय, वृत्तपत्र वाचन केंद्राचेही लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रसारमाध्यमांशी एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. या रुग्णालयातील बेडची क्षमता वाढविण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या. तसेच या रुग्णालयावरील ताण वाढत आहे. परंतु असे असतांना येथील डॉक्टर प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा करीत आहेत. मात्र, याच शिकाऊ डॉक्टरांच्या हॉस्टेलमध्ये असुविधा असल्याचे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. 

वास्तविक पाहता या डॉक्टरांना चांगल्या सोई सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही रुग्णालय प्रशासनाची असतांनाही त्याकडे कानाडोळा किंवा दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार अगदी काही वेळेतच याचा ठपका ठेवत या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा आणि उप अधिष्ठाता डॉ. सुचितकुमार कामखेडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली. याला एका वरीष्ठ अधिकाऱ्याने देखील दुजोरा दिला.

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे