शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा परवान्यांना स्थगिती द्या

By admin | Updated: May 5, 2017 05:56 IST

वाहनांची वाढणारी संख्या लक्षात घेता वाहतुकीचा प्रश्न दिवसागणिक गंभीर बनत चालला आहे. एमएमआरडीए क्षेत्रातील रिक्षांची

कल्याण : वाहनांची वाढणारी संख्या लक्षात घेता वाहतुकीचा प्रश्न दिवसागणिक गंभीर बनत चालला आहे. एमएमआरडीए क्षेत्रातील रिक्षांची संख्या पुरेशी असल्याने नवीन रिक्षा परवान्यांना तात्पुरती स्थगिती द्यावी, अशी मागणी कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाने परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांनाही निवेदन दिले आहे.रिक्षांची वाढलेली संख्या पाहता उपनगरांतील रेल्वे स्थानक परिसरात पार्किंग व रिक्षा स्टॅण्डसाठी जागा अपुरी पडत आहे. २०१४-१६ यामध्ये आॅनलाइनद्वारे नवीन परवान्यांचे वाटप करण्यात आले. तसेच नूतनीकरणास विलंब झाल्यामुळे रद्द झालेल्या रिक्षा परवान्यांचे अभय योजनेद्वारे शुल्क आकारून नूतनीकरण करण्यात आले. त्यामुळे रिक्षांच्या संख्येत भर पडली आहे. अन्य दुचाकी आणि चारचाकी वाहनांचीही वाढलेली संख्या पाहता याचा फटका रिक्षा व्यवसायालाही बसत असल्याने शहरे व उपनगरे परिसरांत भविष्यात होणाऱ्या स्मार्ट सिटीच्या पार्श्वभूमीवर लोकसंख्येचे प्रमाण पाहून त्या प्रमाणात नवीन रिक्षा परवानावाटप करण्याचा निर्णय घ्यावा, याकडे महासंघाचे अध्यक्ष व नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी लक्ष वेधले आहे. भविष्यात त्यात्या शहरात रिक्षा परवाने देण्याची आवश्यकता भासल्यास शहरातील रस्त्यांची परिस्थिती, लोकसंख्या, वाहतुकीची समस्या व इतर बाबींचा विचार करावा तसेच प्रत्येक शहरात किमान किती रिक्षांची गरज आहे, त्यानुसारच तिथल्या स्थानिक वाहतूक पोलीस, पोलीस ठाण्याचे अधिकारी, रिक्षा संघटना आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांची मते जाणून घ्यावीत, असेही महासंघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)वारसदारांची नोंद करा रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्यास त्याचा परवाना वारसदार म्हणून आई, पत्नी व मुलगा यांच्या नावे करताना (वारसाहक्कपत्र) बऱ्याच प्रक्रियेला सामोरे जावे लागते. या प्रक्रियेत आर्थिक तसेच वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे परवाना नूतनीकरणावेळी रजिस्टरमध्ये परवानाधारकांच्या वारसदारांची नोंद व्हावी, जेणेकरून परवानाधारकाची वारसदार परवाना हस्तांतर प्रक्रिया सोयीची व पारदर्शक होईल, याकडेही महासंघाने लक्ष वेधले आहे.