शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महिलेस लुबाडणारा नायजेरियन अटकेत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 05:47 IST

वधूवर सूचक संकेतस्थळावरून संपर्कात आलेल्या ठाण्यातील एका महिलेस साडे तीन लाखांना गंडवणाºया एका नायजेरियन आरोपीस ठाणे पोलिसांनी हरियाणातून अटक केली.

ठाणे : वधूवर सूचक संकेतस्थळावरून संपर्कात आलेल्या ठाण्यातील एका महिलेस साडे तीन लाखांना गंडवणाºया एका नायजेरियन आरोपीस ठाणे पोलिसांनी हरियाणातून अटक केली. तो आणखी तिघींना फसवण्याच्या प्रयत्नात होता, अशी माहिती सहपोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाºया एका महिलेने शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर स्वत:च्या नावाची नोंदणी केली होती. या माहितीच्या आधारे एका नायजेरियन युवकाने तो भारतीय असल्याची बतावणी करून महिलेशी व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर सोशल मीडियाच्या मदतीने संपर्क साधला. महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून पैसे घेतले. एकदा त्याने आपण दिल्ली विमानतळावर असून आपल्याजवळील ४० हजार अमेरिकन डॉलर्स भारतीय चलनात बदलण्यासाठी टॅक्स भरण्याकरिता ३ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. महिलेने विश्वास ठेवून त्याच्या खात्यात रक्कम जमा केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने यासंदर्भात कासारवडवली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सायबर सेलने या प्रकरणाचा समांतर करून शादी डॉट कॉम आणि मोबाइल कंपन्यांकडून आवश्यक तांत्रिक तपशील गोळा केला. त्यावरून आरोपी अर्नेस्ट उसनोबून हा हरियाणातील गुडगाव येथील असल्याची माहिती मिळाली. पोलीस या पत्त्यावर गेले असता, तिथे तो रहात नसल्याचे कळले. त्यानंतर, पोलिसांनी आरोपीचा त्याच शहरातील नवीन पत्ता शोधून त्याला अटक केली.पोलीस कोठडीत रवानगीआरोपीजवळ नायजेरियासह दक्षिण आफ्रिका आणि लेसिथोप या देशांचेही पासपोर्ट आढळले. होंडा सिव्हिकसारखी महागडी कार तो वापरत असून ती जप्त केल्याचे सायबर सेलचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी सांगितले. आरोपीस सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.