शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

शहापुरात आदिवासी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 01:19 IST

शहापूर तालुक्यातील शेणवे आश्रमशाळेतील अंजली पारधी या दहावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथे उघडकीस आली आहे.

- रवींद्र सोनावळे शेणवा : शहापूर तालुक्यातील शेणवे आश्रमशाळेतील अंजली पारधी या दहावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथे उघडकीस आली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी या घटनेची पोलिसांना माहिती न देता, परस्पर दफनविधी केल्याने संशय व्यक्त होत आहे.वासिंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेणवे येथील शासकीय कन्या आश्रमशाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली सोळावर्षीय आदिवासी विद्यार्थिनी अंजली गुरु नाथ पारधी ही गणेशोत्सवाच्या सुटीसाठी तालुक्यातील रास येथे आपल्या गावी घरी गेली होती. दरम्यान, अंजलीने ११ सप्टेंबर रोजी राहत्या घरात दुपारी दीड वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. अंजलीचे वडील गुरु नाथ सखाराम पारधी यांनी या घटनेची माहिती पोलिसांना न देता अंजलीच्या पार्थिवावर परस्पर दफनविधी केला. हा संशयास्पद प्रकार असून, याबाबत चौकशी करण्याची मागणी रास येथील बाळू मंगल बरोरा यांनी वासिंद पोलिसांकडे केली. त्यानुसार, याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.दरम्यान, सुटी संपल्यानंतरही अंजली आश्रमशाळेत परत न आल्याने शाळेचे मुख्याध्यापक, महिला अधीक्षिका व शिक्षकांनी तिचे रास येथील घर गाठले. अंजलीबाबत चौकशी केली असता, तिचा मृत्यू झाल्याचे त्यांना समजले. ही घटना गंभीर असल्याने शाळेच्या मुख्याध्यापकांनी आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांना याबाबत तत्काळ माहिती दिली. त्यानुसार, प्रकल्प अधिकाऱ्यांनी आदिवासी विद्यार्थी आपत्कालीन मृत्यू चौकशी समितीला याबाबत कळवले आहे. वासिंद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोरे हे पुढील तपास करत आहेत. अंजलीने गळफास का घेतला, तिचा परस्पर दफनविधी का केला, या प्रश्नांचा शोध ते घेत आहेत.>अंजलीच्या मृत्यूप्रकरणी प्राथमिक गुन्हा नोंदवण्यात आला असून, याप्रकरणी विविध मुद्यांवर चौकशी सुरू आहे.- राजा वंजारी, पोलीस निरीक्षक, वासिंद पोलीस ठाणे