शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सव्वादोनशे कोटींचे ठेवले लक्ष्य

By admin | Updated: July 17, 2017 01:11 IST

महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाने वर्षाला सव्वादोनशे कोटींच्या वसुलीचे लक्ष्य ठेवले आहे. ३७६ कोटींचा मालमत्ताकर थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाने वर्षाला सव्वादोनशे कोटींच्या वसुलीचे लक्ष्य ठेवले आहे. ३७६ कोटींचा मालमत्ताकर थकबाकी असून नागरिकांनी मुदतीत बिले भरण्याचे आवाहन विभागाचे प्रमुख युवराज भदाणे यांनी केले आहे. महिला बचत गटाने जून महिनाअखेर १ लाख ७२ हजार बिले घरोघरी जाऊन वाटली आहेत. आयुक्तांनी अंदाजपत्रक सादर करताना करवाढ न करता मालमत्ताकराच्या थकबाकी वसुलीवर भर दिला आहे. सव्वादोनशे कोटींचे उत्पन्न आयुक्तांनी गृहीत धरले असून वसुलीचे आदेश मालमत्ता विभागाला दिले आहेत. महापालिकेत अभय योजना लागू होईल, या आशेवर नागरिकांनी बसू नये, असे भदाणे यांनी सांगितले. मालमत्ताकर विभागाची वसुली कमी झाल्याचा ठपका करनिरीक्षकासह लिपिकावर ठेवून त्यांच्यावर कारवाई केली होती.महापालिकेने दोन वर्षांपूर्वी अभय योजना सुरू केली होती. योजनेमुळे ५२ कोटी जमा झाले होते. त्यामुळे या वर्षीही अभय योजनेची मागणी सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून होत आहे. नागरिकांनी त्वरित मालमत्ताकर भरावा. तो न भरल्यास दंडाची रक्कम वाढत जाईल. थकबाकीधारकांवर कारवाई सुरू करण्याचे संकेत भदाणे यांनी दिले आहेत.विभागाने गेल्या वर्षी पाच लाखांपेक्षा जास्त मालमत्ताधारकांना नोटिसा पाठवल्या होत्या. त्यानंतर, सरसकट नोटिसा पाठवून मोठ्या थकबाकीधारकांच्या मालमत्ता जप्त करून लिलावात काढल्या होत्या. विक्रमी वसुलीचा ध्यास विभागाने गेल्या वर्षी ११२ कोटींची वसुली अभय योजनेसह केली होती. पालिकेच्या इतिहासात अशी वसुली केव्हाच झाली नव्हती. या वर्षीही विक्रमी वसुली करण्याचा मानस उपायुक्त जमीर लेंगरेकर व करनिर्धारक संकलक शैलेश दोंदे यांनी व्यक्त केला आहे. १२५ कोटींचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.