शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सुरेश टावरेंच्या उमेदवारीमुळे होती काँग्रेसमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 01:14 IST

भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्यावेळी भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला.

- पंढरीनाथ कुंभारभिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्यावेळी भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला. त्यानंतर, झालेल्या पहिल्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे अबू आसीम आझमी निवडून आले होते. परंतु, ते मुंबईतील गोवंडी येथे निवडून आल्याने त्यांनी या जागेचा राजीनामा दिला. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत आझमी यांचा मुलगा फरहान आझमी यांनी निवडणूक लढवली. त्यावेळी भाजप-सेना युतीचे उमेदवार रूपेश म्हात्रे निवडून आले. त्यानंतर, २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत सेना व भाजप युती नव्हती. तरीही, शिवसेनेचे म्हात्रे भाजप व समाजवादी पक्षाच्या उमेदवारास पराभूत करून निवडून आले. त्यामुळे या विधानसभा क्षेत्रातून समाजवादीचे उमेदवार डॉ. नुरूद्दीन अन्सारी यांना चांगली मते मिळणे अपेक्षित होते. परंतु, त्यांना केवळ ६८५ मते मिळाली. यावरून भिवंडी पूर्व मतदारसंघातील समाजवादी पक्षाचा प्रभाव संपुष्टात आला, असे अनुमान काढता येईल.समाजवादीला मिळणारी मतेही अपेक्षेप्रमाणे काँग्रेसला मिळालेली नाहीत. याचे कारण म्हणजे काँग्रेसचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचले नाहीत. भिवंडी लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी दिल्याने नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली होती. त्यांनी बंडखोरी केली होती. त्याचप्रमाणे काँग्रेस शहराध्यक्ष शोएब गुड्डू यांनीही या वस्तुस्थितीकडे फारसे लक्ष न देता त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला नाही. मतदारसंघात काँग्रेसने सेलिब्रेटींच्या सभा घेतल्या नाहीत. परिणामी, काँग्रेसचा प्रचार मतदारांपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे या मतदारसंघातील मतदान कपिल पाटील यांना मिळालेल्या मतांपेक्षा २३ हजारांनी वाढलेले दिसले, तरी अपेक्षेप्रमाणे ते कमी झाल्याचे दिसून येते. त्याउलट, या मतदारसंघातील मतदान मिळवण्यासाठी पाटील व सेनेचे म्हात्रे यांनी चांगलेच प्रयत्न केले. येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमदार म्हात्रे यांनी आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पाटील यांना ४७,०१८ मते मिळाली. तर, वंचित आघाडीचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत न पोहोचल्याने ३८०३ मतांवर समाधान मानावे लागले.>विधानसभेला काँग्रेसलायश मिळणे कठीणलोकसभा निवडणुकीत उमेदवार कपिल पाटील यांच्याविरोधात शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने बंड पुकारले. त्याचा परिणाम होऊ न देता शिवसेनेचे आमदार व नगरसेवकांनी या मतदारसंघात चांगले काम केले. त्याप्रमाणे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही मते मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे ही जागा पुढील निवडणुकीत युतीकडे राहण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. एकूणच काँग्रेसला या मतदारसंघात कितपत यश मिळेल, हे काळच ठरवणार आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजी शमणे अत्यंत गरजेचे आहे.>की फॅक्टर काय ठरला?काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना पक्षातील गटाचा विरोध असताना त्यांनी विश्वासातील कार्यकर्त्यांना हाताशी धरून मते मिळवली.शिवसेना आमदार रूपेश म्हात्रे यांनी विधानसभेची संधी पुन्हा मिळवण्यासाठी भाजप उमेदवार कपिल पाटील यांचे काम करत युतीधर्म टिकवला.या मतदारसंघातील काही काँग्रेस नगरसेवक व नाराज गटांनी काम न केल्याने भाजप उमेदवाराला अपेक्षेपेक्षा लीड कमी मिळाले.