शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश द्वादशीवार यांच्या वक्तव्याचा अखिल भारतीय साहित्य परिषदेकडून निषेध

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: October 13, 2022 17:20 IST

Suresh Dwadashiwar: “ललित साहित्याचे बहुतांश लेखक हे उच्चवर्णीय होते त्यामुळे त्यांच्यावर सावरकरांच्या विचारांचा पगडा असल्याने ते गांधी विरोधी होते.” असे वक्तव्य केल्याने प्रा. सुरेश द्वादशीवार यांचा अखिल भारतीय साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत आहे.

- प्रज्ञा म्हात्रे ठाणे : “ललित साहित्याचे बहुतांश लेखक हे उच्चवर्णीय होते त्यामुळे त्यांच्यावर सावरकरांच्या विचारांचा पगडा असल्याने ते गांधी विरोधी होते.” असे वक्तव्य केल्याने प्रा. सुरेश द्वादशीवार यांचा अखिल भारतीय साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत आहे. तसे पत्र त्यांनी प्रसिद्ध केले आहे. अशी द्वेषमुलक भाषणे करणाऱ्या आणि तशीच मते असणाऱ्या माणसांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष केले जाऊ नये असे अखिल भारतीय साहित्य परिषदेचे स्पष्ट मत आहे असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. 

वर्धा येथे होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक द्वादशीवार, लेखक अच्युत गोडबोले आणि ज्येष्ठ कवी प्रा. प्रविण दवणे यांची नावे सुचविलेली आहेत. गोवा, फोंडा येथे  शनिवार १५ बर ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत एकमताने अध्यक्षपदाची निवड होणार आहे. या अध्यक्षपदाच्या स्पर्धेत असणाऱ्या द्वादशीवार यांच्या वक्तव्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपल्यातील जात धर्म यांचे भेदाभेद मिटवून आपण एकत्र आले पाहिजे असा लोकांना उपदेश करणारे द्वादशीवार यांनी स्वतःच्या भाषणात मात्र भेदभावाला खतपाणीच घातले आहे. मराठीतील बहुतांश ललित लेखक हे ब्राह्मण होते, ललित साहित्याचे बहुतांश लेखक हे उच्चवर्णीय होते. त्यामुळे त्यांच्यावर सावरकरांच्या विचारांचा पगडा असल्याने ते गांधी विरोधी होते आणि त्यांनी महात्मा गांधींना न्याय दिला नाही असे वर्णभेद निर्माण करणारे, भावना भडकावून दुही माजवणारे विखारी भाषण त्यांनी केले.

दक्षिणायन महाराष्ट्र या संस्थेच्या नागपूर येथील कार्यक्रमात ते बोलत होते असे अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. नरेंद्र पाठक यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. आपल्या भाषणात खांडेकर ते प्र.के. अत्रे यांच्यापर्यंत अनेकांची निंदा करत त्यांनी न्यायालयांवरही टीका केली. न्यायालये सुद्धा सध्या स्वच्छ राहिली नाहीत, हिंदू मताची झाली आहेत असे म्हणत अत्यंत अवमानकारक भाषण केले. अशी भाषणे करून समाजातील भेदांना उत्तेजन देणाऱ्या विषारी प्रवृत्तीचा अखिल भारतीय साहित्य परिषद तीव्र निषेध करत आहे असे पाठक म्हणाले. साहित्याच्या उद्देश समाज तोडणे नसून समाज जोडणे आहे हे विसरून चालणार नाही. साहित्य संमेलनाचा अध्यक्षच जर भेदाला उत्तेजन देणारा असेल तर ते साहित्य संमेलन समाजाला कोणती दिशा दाखवणारे असेल? असा सवाल पाठक यांनी परिषदेच्यावतीने उपस्थित केला आहे.

टॅग्स :marathiमराठीthaneठाणे