शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे-पालघरच्या १२८ शेतकरी वारसांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 02:11 IST

ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये शेतीकामे करताना झालेल्या दुर्दैवी घटनांमध्ये मागील आठ वर्षांत १२८ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

ठाणे : ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये शेतीकामे करताना झालेल्या दुर्दैवी घटनांमध्ये मागील आठ वर्षांत १२८ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत मदत देण्यात आली आहे. यामध्ये २०१४-१५ पर्यंत १०७ जणांना प्रत्येकी एक लाख तसेच २०१५-१६ मध्ये योजनेला गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्यात आले. २०१६-१७ पर्यंत जिल्ह्यातील २१ शेतक ºयांना प्रत्येकी दोन लाखांची मदतवाटप केल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली.शेतात पाणी सोडण्यासाठी शेतकरी रात्रीच्यावेळी जात असतात. त्यावेळी अनेकदा अपघात होऊन त्यात त्यांचा मृत्यू अथवा गंभीर दुखापत होण्याच्या घटना घडतात. ही बाब लक्षात घेऊन शासनाने शेतकरी अपघात विमा योजना २००५-०६ पासून सुरू केली. त्यानंतर, २००९ पासून या योजनेचे नाव बदलून शेतकरी जनता अपघात विमा योजना केले होते. दरम्यान, २००९-१० पासून ते २०१४-१५ या कालावधीत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील १०७ शेतकºयांच्या अपघातांसंदर्भात विविध प्रस्ताव मंजूर करण्यात आले. तसेच त्या वर्षीच्या योजनेनुसार त्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाखाची मदत सुपूर्द केली आहे.त्यानंतर, २०१५-१६ मध्ये या योजनेतील मदतही दुप्पट केली. अपघाती मृतांना मिळणारी मदत दोन लाख तर, जखमी होऊन एक अवयव निकामी झाल्यावर एक लाख किंवा दोन्ही अवयव निकामी झाल्यास दोन लाख अशी मदत देण्यास सुरु वात केली. त्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना लागू झाल्यानंतर २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षांत जिल्ह्यातील २१ शेतकºयांच्या वारसांना मदतीचे वाटप केले.