शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सुनंदा कोट यांना मिळाली ‘क्लीन चिट’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:39 IST

स्वत:च्या पक्षाचे सूचक अनुमोदक नसतानाही शिवसेनेच्या सहकार्याने प्रभाग समिती अध्यक्षपदी निवडून आलेल्या सुनंदा कोट यांना त्यांच्या मनसे पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

कल्याण : स्वत:च्या पक्षाचे सूचक अनुमोदक नसतानाही शिवसेनेच्या सहकार्याने प्रभाग समिती अध्यक्षपदी निवडून आलेल्या सुनंदा कोट यांना त्यांच्या मनसे पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. परंतु, आजतागायत कोणतीही कारवाई त्यांच्यावर न झाल्याने मनसेने त्यांना ‘क्लीन चिट’ दिल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. दरम्यान, कोट यांचा खुलासा पक्षाचे सरचिटणीस राजू पाटील यांच्यामार्फत पक्षश्रेष्ठींकडे पाठवल्याची माहिती मनसेचे गटनेते प्रकाश भोईर यांनी दिली. त्यांच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.केडीएमसीच्या १० प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक ५ जुलैला झाली. दहाही समित्यांवर महिला उमेदवारांचा प्रत्येकी एकमेव अर्ज आल्याने त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. ‘अ’ प्रभाग समितीवर अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मनसेच्या नगरसेविका सुनंदा मुकुंद कोट यांनीही अर्ज दाखल केला होता. विशेष म्हणजे, या प्रभागात अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी पुरेसे सूचक व अनुमोदक नसताना कोट यांनी शिवसेनेच्या सहकार्याने अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांना शिवसेनेचे गणेश कोट आणि हर्षाली थवील यांचे सूचक आणि अनुमोदन लाभले होते. ‘अ’ प्रभागात एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणुकीच्या वेळी त्यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.दरम्यान, अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरताना कोट यांनी त्यांच्या मनसे पक्षाला अंधारात ठेवले तर महापालिकेतील मनसेचे पदाधिकारी असलेले विरोधी पक्षनेते मंदार हळबे आणि गटनेते प्रकाश भोईर यांना याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. भोईर यांनी पक्षातील वरिष्ठांकडे चौकशी करताच त्यांनाही कोट यांनी कल्पना दिली नसल्याचे समजले. त्यामुळे गटनेत्यांनी कोट यांना रितसर कारणे दाखवा नोटीस बजावली. परंतु, पक्षाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.