उल्हासनगर : शहरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १७ वर्षाच्या अल्पवयीन गरोदर मुलीने आत्महत्या केली. शेजारच्या मुलासोबत तिचे प्रेमसंबंध होते. लग्नाच्या विरोधातून मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रेमसंबंधातून ही मुलगी गरोदर राहिली. मुलीने मुलाच्या घरी जाऊन लग्नाची मागणी केली. मात्र त्यांनी विरोध केल्याने तिला प्रचंड धक्का बसला. मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. (प्रतिनिधी)
अल्पवयीन गरोदर मुलीची आत्महत्या
By admin | Updated: November 17, 2016 07:31 IST