शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदरमध्ये टोमॅटो व्यावसायिकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:33 IST

महिलेसह पोलिसाचा त्रास : चिठ्ठी सापडली

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : भार्इंदर पश्चिमेस असलेल्या शिवसेना गल्लीतील महेशनगरमध्ये राहणाऱ्या रमेश पाठक (५१) या टॉमेटो व्यावसायिकाने मंगळवारी सकाळी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या चिठ्ठीत एका पोलिसासह महिला व तिच्या मुलाचा उल्लेख केला आहे.रमेश पाठक यांनी महेशनगरातील सदनिका २0१३ साली नयना यांना ३ लाख रुपयांच्या अनामत रकमेवर विनाभाड्याने दिली होती. तिथे नयना दोन मुलांसह राहत होत्या. ही सदनिका २0१७ मध्ये नयना यांनी रिकामी केली असली. मात्र अनामत रक्कम व भाडे करारावरून वाद सुरू होता. अनामत रक्कम परत मिळाली नसल्याचे नयना सांगत होत्या, तर पाठक कुटुंब मात्र अनामत रक्कम देऊनदेखील नयना करारनाम्याची प्रत देत नसल्याचा दावा करत आहे. अशातच मंगळवारी पाठक यांनी आत्महत्या केली. त्यांनी लिहलेल्या चिठ्ठीत नयना, लालू व कदम हे पाच लाख रुपये मागत होते. तशी कागदपत्रेही करून देण्यासाठी ते सांगत होते, असे लिहिले आहे. भार्इंदर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून नयना व लालू यांची चौकशी सुरू केली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.पैशासाठी होता तगादानयना, त्यांचा मुलगा लालू व कदम नावाच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसाने पैसे देण्यासाठी पाठक यांच्याकडे तगादा लावला होता. सोमवारी एका वकीलाकडे पाठक यांना कागदपत्रे बनवून घेण्यासाठी बोलावले होते. पण वकील नसल्याने कागदपत्रे झाली नाही.