शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पासाठी सुचवा आपापली ठोस कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:12 IST

आयुक्त लवकरच स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यात आणखी काही ठोस कामे सुचवायची असतील

कल्याण : आयुक्त लवकरच स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यात आणखी काही ठोस कामे सुचवायची असतील, तर नगरसेवकांनी ती सुचवावी, असे पत्र कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती राहूल दामले यांनी सर्व नगरसेवकांना पाठवले आहे.गेल्या दोन वर्षातील अर्थसंकल्प पाहिला, तर महापालिकेच्या उत्पन्नात भरीव वाढ झालेली नाही. महापालिका आर्थिक कोंडीत असल्याने त्याचा विकासकामांवर परिमाण झाला. फायली मंजूर झाल्या नाहीत. महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात ३०० कोटीची तूट होती. पुढील वर्षी ती ३३४ कोटींवर जाण्याची शक्यता आयुक्त पी. वेलरासू यांनी आर्थिक स्थितीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल महासभेत सादर करताना मांडली होती.विकासकामे होत नसल्याने नगरसेवक वैतागले होते. आर्थिक कारणांमुळे विकासकामांची कोंडी होत असल्याने शिवसेनेच्या सदस्यांनी आयुक्तांच्या दालनात आंदोलन करुन त्यांची खुर्ची टेबलावर आपटली होती. ही परिस्थिती लक्षात घेता गटारे-पायवाटांचीच कामे होतच राहतील. मात्र प्रत्येक प्रभागात एखादे ठोस काम सुचविल्यास त्याचा प्राधान्याने केला जाईल. महापालिकेच्या अर्थसंकल्पात नगरसेवकाला त्याच्या प्रभागात कामे करण्यासाठी वर्षाला ३५ लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला जातो. त्या निधीव्यतिरिक्त नगरसेवकाने ठोस काम सुचविल्यास अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद करण्यात येईल. त्यासाठी आयुक्तांशी विचारविनिमय करुन ठोस कामासाठी निधीही मिळविता येईल, या भावनेतून हे पत्र पाठवण्यात आले आहे. आयुक्त २७ तारखेला स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करतील. त्यात काही बदल सुचवून तो महासभेला पाठविला जाईल. तत्पूर्वी या सूचना मिळाल्यास महासभेला अर्थसंकल्प पाठवण्यापूर्वी त्याचा विचार करता येईल, असे त्यांनी सुचवले आहे.