शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

साखरेचे भाव स्थिर; पण तीळ, गुळाचे दर वाढल्याने खरेदीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:39 IST

महागाईमुळे संक्रांतीचा गोडवा यंदा कमी होणार ? गेल्या वर्षभरात कोरोनामुळे अनेक सण उत्सव साजरे करता आले नाही.

स्नेहा पावसकरलोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाची लोकांच्या मनातील भीती आता हळूहळू कमी होत आहे. त्यातच नवे वर्ष नव्या आशा, अपेक्षा घेऊन आले आहे. या नव्या वर्षाचा पहिला सण मकरसंक्रांत अगदी आठ दिवसांवर आला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झालेली नसली तरी गूळ, साखर, तीळ आणि अन्य वस्तू बाजारात विक्रीसाठी आल्या असून साखर वगळता इतर वस्तूंचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे यंदा संक्रांतीचा गोडवा कमी होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षभरात कोरोनामुळे अनेक सण उत्सव साजरे करता आले नाही. मात्र वर्षातला पहिला संक्रांतीचा सण अनेक जण साजरा करतात. महिलांना तर हळदी कुंकू आणि तीळगुळाची आवड. या तीळगुळाची बाजारात विक्री सुरू झाली असून त्याच्या दरातही वाढ झाली आहे. साखरेचे भाव गेल्या महिन्याइतके स्थिर असून तीळगुळाच्या दरामध्ये २० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे.

तिळाचे दरतिळाचे प्रकार असतात. लाडू, चिक्कीसाठी पाॅलिशचा चांगला तीळ वापरला जातो. त्याचा दर २५०-२६० रुपये किलो आहे. साधे तीळ २०० - २१० रुपये किलो आहेत. गुळाचे दरगूळ साधारणपणे अनेक पदार्थांत वापरला जातो. गुळाच्या किमती मात्र गेल्या महिन्यापेक्षा वाढल्या आहेत. साधा गूळ सध्या ७० ते ८० रुपये किलो आहे. चिकीचा गूळ ८० ते १०० रुपये किलो आहे.साखरेचे भावसाखरेचे दर गेल्या महिन्याइतकेच स्थिर आहेत. सुदैवाने त्यात सध्या तरी वाढ झालेली नाही. किरकोळ दुकानातही ती ४० ते ४२ रुपये किलो आहे. त्यामुळे सक्रांतीत ग्राहकांना तेवढाच काय तो दिलासा म्हणावा लागेल.

मकरसंक्रांत म्हटली की तिळगुळाशिवाय कोणताच पदार्थ होत नाही. त्यामुळे तीळगूळ लागतोच. परंतु त्याचे वाढलेले दर पाहता यंदा सण जरा आवरता घ्यावा लागेल.-दिव्याक्षी मांडवकर, गृहिणी

साखरेचे भाव वगळता तीळगुळाचे दर वाढले आहेत. अजून महिलावर्गाकडून फारशी मागणी सुरु झालेली नाही. वाढते दर पाहता तीळगुळासाठी ग्राहक किती येतील, याची खात्री नाही.-देवीदास चाैहान, किराणा दुकानदार