शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘नागूबाई’च्या कुटुंबीयांना ‘बीएसयूपी’ची घरे, पालकमंत्री शिंदे यांच्या पाठपुराव्याला लाभले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 05:28 IST

नागूबाई निवास या इमारतीमधील बेघर मध्यमवर्गीय कुटुंबांना बीएसयूपी प्रकल्पात बांधलेली व रिकामी असलेली घरे तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यास देण्याकरिता राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने विशेष बाब म्हणून मंजुरी दिल्याने येथील ७२ कुटुंबांपैकी ४६ कुटुंबांना अखेर पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर निवारा लाभला.

डोंबिवली : नागूबाई निवास या इमारतीमधील बेघर मध्यमवर्गीय कुटुंबांना बीएसयूपी प्रकल्पात बांधलेली व रिकामी असलेली घरे तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यास देण्याकरिता राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने विशेष बाब म्हणून मंजुरी दिल्याने येथील ७२ कुटुंबांपैकी ४६ कुटुंबांना अखेर पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर निवारा लाभला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेली विनंती मान्य झाल्याने या कुटुंबांना घराच्या चाव्यांचे वाटप करताना शिंदे यांनी फडणवीस यांचे विशेष आभार व्यक्त केले.देवीचा चौक येथील इमारत शुक्रवारी रात्री खचली. तेव्हापासून ही कुटुंबे रस्त्यावर आली होती. त्यापैकी काही घरांत विवाहाची तयारी सुरू होती, तर कुणाच्या घरात परीक्षार्थी विद्यार्थी होते. त्यामुळे या कुटुंबीयांनी घराकरिता आर्जवं केली होती. बीएसयूपी योजनेतील घरे या कुटुंबांना देण्याकरिता महापौर राजेंद्र देवळेकर व शिवसेनेचे नेते आग्रही होते. मात्र, केडीएमसीचे आयुक्त वेलरासू व अन्य अधिकारी यांनी नियमानुसार ही घरे मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांना देता येत नाहीत, या नियमावर बोट ठेवले होते. यामुळे सत्ताधारी व प्रशासन यांच्यात तणाव निर्माण झाला होता. ‘लोकमत’ने या रहिवाशांची व्यथा व तणाव याबाबत सातत्याने वार्तांकन केले होते.अखेर, पालकमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन विशेष बाब म्हणून ही घरे नागूबाईच्या रहिवाशांना देण्याची परवानगी मिळवली. घरांकरिता अर्ज केलेल्या ४६ कुटुंबांना कचोरे येथील निवासनगरमध्ये तात्पुरता निवारा मिळाला. शिंदे यांनी घरांच्या चाव्या रहिवाशांना सुपूर्द केल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे बेघर झालेल्या नागरिकांना निवारा देणे शक्य झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, असे ते म्हणाले. रहिवाशांनी फडणवीस आणि शिंदे आगे बढो... असा नारा दिला.घरांचा ताबा देताना घर, परिसर स्वच्छ ठेवा. घाण करू नका, असे आवाहन शिंदे यांनी केले. हा निवारा तात्पुरता असून नागूबाई निवासचे मालक भरत जोशी यांनी तातडीने इमारत उभी करावी. मूळ भाडेकरूंना घरे द्यावी, असे शिंदे यांनी बजावले. महापौर देवळेकर, सभागृह नेते मोरे याकरिता पाठपुरावा करतील, असेही ते म्हणाले. बीएसयूपीची घरे ही तात्पुरती मलमपट्टी असून क्लस्टर डेव्हलपमेंट हाच मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा दूरगामी मार्ग असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.असा सुटला तिढादोन दिवसांपासून शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्या रहिवाशांना आधार मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता.बुधवारी सकाळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव संजीवकुमार यांनी बीएसयूपीतील घरे तात्पुरत्या स्वरूपात विशेष बाब म्हणून देण्यास मुख्यमंत्र्यांनी होकार दिल्याचे शिंदे यांना कळवल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.घरांकरिता मंगळवारी रात्रीपर्यंत ४६ कुटुंबांनी अर्ज केले होते. घरे मिळत असल्याचे दिसल्यावर आणखी १५ कुटुबांनी बुधवारी अर्ज केले. त्यांनाही घरे दिली जाणार आहेत.इमारत खचल्यापासून रहिवाशांना घरे मिळेपर्यंत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल नागूबाईच्या रहिवाशांनी आभार व्यक्त केले. ‘लोकमत’ची भूमिका महत्त्वाची होती. अन्यथा, पर्यायी निवारा मिळण्यासाठी अडथळे आले असते, असे मत संजय पवार, प्रसाद भानुशाली, चिंतामणी शिदोरे, राशन सावला, संतोष गिट्टे आदींनी व्यक्त केले. महापौर देवळेकर यांनीही लोकमत’चा पाठपुरावा महत्त्वाचा असल्याचे नमूद केले.दरम्यान, कचोºयात चावीवाटपाचा कार्यक्रम सुरू असतानाच धोकादायक नागूबाई निवासचा बहुतांश भाग पाडण्यात आला. गुरुवारी सकाळपर्यंत इमारत पूर्ण पाडण्यात येणार असल्याचे ‘ह’ प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांनी सांगितले.

टॅग्स :dombivaliडोंबिवली