शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

शेतकरी आंदोलन थोपवण्यात यश, आंदोलनापूर्वीच विशेष बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:15 IST

कोकण विभागीय महसूल आयुक्तांनी रीतसर आदेश देऊनही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अंमलबजावणीच्या पूर्ततेकरिता श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली १७ नोव्हेंबर रोजी

जयंत धुळपअलिबाग : कोकण विभागीय महसूल आयुक्तांनी रीतसर आदेश देऊनही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अंमलबजावणीच्या पूर्ततेकरिता श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली १७ नोव्हेंबर रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात अनोखे ‘पंखे पुसा’ आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचा निर्णय शेतकºयांनी घेतला. यामुळे हादरलेल्या रायगड जिल्हा प्रशासनाने बुधवारी श्रमिक मुक्ती दलाच्या शेतकºयांबरोबर विशेष बैठकीचे आयोजन करून प्रलंबित अंमलबजावणीस प्रारंभ करून, जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजित ‘पंखे पुसा’ आंदोलनास थोपविण्यात यश मिळविलेआहे.आंदोलनाची आफत टळल्याने जिल्हा प्रशासन, तर शेतकºयांचा आंदोलनापूर्वीच विजय झाल्याने शेतकरी सुखावले आहेत. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात भू-संपादन उपजिल्हाधिकारी श्रीधर बोधे यांच्या अध्यक्षतेखाली या विशेष बैठकीस संबंधित विविध शासकीय विभागप्रमुख आणि श्रमिक मुक्ती दलाचे शेतकरी उपस्थित होते, अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत व राजन वाघ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.शहापूर-धेरंड परिसरातील रिलायन्स औष्णिक वीज प्रकल्पाच्या भू संपादनासंदर्भात शेतकºयांनी मागितलेली नुकसानभरपाई मिळू नये, म्हणून सरकारच स्वत: सर्वोच्च न्यायालयात गेल्याची माहिती विभाग प्रमुखांनी दिली; परंतु ६०३ शेतकºयांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे, ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा पहिला निर्णय या बैठकीत झाला.मेढेखार परिसरातील खासगी भांडवलदारांनी घेतलेल्या व वापरात नसलेल्या जमिनी शेतकºयांना परत मिळण्याविषयी अलिबाग तहसीलदारांनी अहवाल पूर्ण करून जिल्हाधिकाºयांना निर्णय घेण्यासाठी ८ नोव्हेंबर रोजी सादर करण्याचे बैठकीत कबूल करण्यात आले; परंतु जनतेला या अहवालातील एकही कागद न दाखवल्यामुळे शेतकरी अलिबाग तहसीलदार कार्यालयात तहसीलदारांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला.एमआयडीसी कायदा कलम ३२(१) व (२)नुसार झालेले भूसंपादन व अंतिम संपादनाची माहिती संपादन संस्थेने देण्याचे ठरले. त्याचबरोबर प्रकल्प १६०० मे.वॅ. असताना, २४०० मे.वॅ. चा असल्याची दिशाभूल करणारी माहिती कंपनीकडून देण्यात आली. प्रत्यक्ष १६०० मे.वॅ.साठी किती जमिनीची आवश्यकता आहे, अशी विचारणा करणारे पत्र जिल्हाधिकाºयांनी सेंट्रल इलेक्ट्रिक अ‍ॅथोरिटी यांना पाठविण्याचे ठरले.खारभूमीचे राजपत्र २००३मध्ये घोषित झाले आहे. जमिनीचे संपादन खारभूमी विभागाची पूर्वपरवानगी न घेता, २००६मध्ये एमआयडीसीने केल्यामुळे ते संपादन बेकायदा ठरते. या अनुषंगाने पुनर्वसन विभागाने दिलेला अहवाल दिशाभूल करणारा असल्याने, तो परत दुरु स्त करून देण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले.संयुक्त मोजणीमध्ये तत्कालीन विशेष भूसंपादन अधिकारी जयकृष्ण फड यांनी वनविभागाच्या प्रतिनिधींना हेतूपुरस्सर न आणल्यामुळे संपादन क्षेत्रातील कांदळवनांची नोंद झालेली नाही, ती एक महिन्याच्या आत करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.मानकुळे-धेरंड खाडीवर पूल जोडरस्ते सर्वेक्षण आठ दिवसांतमानकुळे-धेरंड खाडीवर पूल बांधला, त्यास २० वर्षे झाली; परंतु या पुलाचे जोडरस्तेच अद्याप करण्यात आले नसल्याने पुलाचा प्रत्यक्ष वापर होऊ शकला नाही.आता पुलाच्या जोडरस्त्याचे सर्वेक्षण आठ दिवसांत करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले. तर खारभूमी बंधारे खाºया मातीऐवजी लाल माती व मुरु माचे करण्याचे प्रस्ताव नियोजन विभागास देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.१४ नोव्हेंबर रोजी अधीक्षक जलसंपदा व खारभूमी यांची संयुक्त बैठक संघटनेसोबत अगोदरच ठरली असल्याने त्या विषयावर चर्चा तेथेच करायचे ठरले. मात्र, अंबा खोºयाच्या अधिकाºयांनी १३५ द.ल.घ.मी. पाणी शिल्लक असल्याचे कबूल केले. हे पाणी शेतीला देता येईल, असेही त्यांनी मान्य केल्याने या पाण्यामुळे खारेपाटातील ४७५० एकर शेतजमीन ओलिताखाली येण्याचा मार्ग या बैठकीत मोकळा झाला.टाटा पॉवर कंपनीचा बनावट दाखलाटाटा पॉवर कंपनीने जोडलेला शहापूर ग्रामपंचायतीचा २५ जून २००९ चा ‘ना हरकत दाखला’ बनावट असल्याने रायगड जि.प. मुख्यकार्यकारी अधिकाºयांनी २१ डिसेंबर २०१२ रोजी या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असताना, अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. आता हा फौजदारी गुन्हा आठ दिवसांत दाखल केला जाईल, असे आश्वासन बैठकीत देण्यात आले.