शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 01:18 IST

एमआयडीसीतील प्रोबेस कंपनीत २६ मे २०१६ ला झालेल्या स्फोटाने डोंबिवली हादरली होती.

डोंबिवली : एमआयडीसीतील प्रोबेस कंपनीत २६ मे २०१६ ला झालेल्या स्फोटाने डोंबिवली हादरली होती. तसेच चार वर्षांपूर्वी याच परिसरात झालेला हिरवा पाऊस चांगलाच गाजला होता. दोन दिवसांपूर्वीच रसायनांच्या उग्रवासाने येथील रहिवाशांना त्रास झाला होता. या परिसरात भोपाळसारखी दुर्घटना आणि प्रदूषणापासून डोंबिवलीला वाचवण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ज्येष्ठ शिवसैनिक प्रफुल देशमुख यांनी केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाला केलेल्या पत्रव्यवहाराचीही दखल घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले.केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामानबदल मंत्रालयाची औद्योगिक प्रदूषणाबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. याबाबत १ जानेवारी २०१५ ला एक मार्गदर्शक पत्रिका केंद्रातर्फे प्रसारित करण्यात आली. यामध्ये कारखान्यांनी घ्यायची सर्वप्रकारच्या खबरदारी व उपाययोजनांची माहिती नमूद केली आहे. त्यात रासायनिक अपघात (नियोजन आणि सज्जता) नियम १९९६ नुसार केंद्र, राज्य, जिल्हा व स्थानिक अशा चार स्तरावर उपाययोजना करणारी यंत्रणा उभारण्याची सक्ती करण्यात आली आहे. सर्व उपाययोजनांच्या देखरेखीसाठी राज्य, जिल्हा तसेच विभागीय स्तरावर समिती स्थापन करण्याचे आदेशही दिलेले आहेत. मात्र या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असून त्याचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे, अशी नाराजी देशमुख यांनी व्यक्त केली.>परिपत्रकात सूचवलेल्या उपाययोजनाज्या कारखान्यातून धोकादायक रसायने हाताळली जातात, त्यांची विभागवार यादी प्रसिद्धी माध्यमांद्वारे नागरिकांना अवगत करून द्यावी. तसेच या कारखान्यांची मासिक चाचणी करून सर्व मार्गदर्शक तत्त्वांची उपाययोजना केली आहे का, याची पाहणी करावी. दर सहा महिन्यांत धोकादायक कारखान्यांत विभागवार मॉक ड्रील म्हणजेच आपत्कालीन यंत्रणेचे प्रात्यक्षिक घेणेही आवश्यक आहे. या विभागासाठी आपत्कालीन सेवा आवश्यक आहे, असे केंद्राच्या परिपत्रकात म्हटले आहे.