शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मेहता यांच्या हॉटेलच्या थकीत मालमत्ताकराचा अहवाल सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:30 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रभाग सहा अंतर्गत घोडबंदर मार्गावर आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीचे सी एन रॉक हॉटेल असून या हॉटेलची मालमत्ता करापोटी सुमारे २३ लाखांची थकबाकी असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रभाग सहा अंतर्गत घोडबंदर मार्गावर आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीचे सी एन रॉक हॉटेल असून या हॉटेलची मालमत्ता करापोटी सुमारे २३ लाखांची थकबाकी असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत पालिकेचे अतिरीक्त आयुक्त माधव कुसेकर यांनी कर विभागाला त्याचा अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले आहेत.या हॉटेलचे व्यवस्थापन मेहता यांच्या मे. सेव्हन इलेव्हन हॉटेल्स प्रा. लि. कंपनीमार्फत चालवले जाते. तर त्यांचे धाकटे बंधू विनोद हॉटेलचे संचालक असल्याचे सांगण्यात येते. या हॉटेलची मागील वर्षाची थकबाकी सुमारे १८ लाख इतकी असतानाही प्रशासनाने अद्याप त्याच्या वसुलीसाठी कागदी घोडे नाचविण्याखेरीज कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचे समोर आले आहे. चालू वर्षातील थकीत कराचा आकडा सुमारे २३ लाखांवर गेला असला तरी त्यावर महिन्याला २ टक्के व्याज विभागाकडून आकारले जाते. त्यामुळे थकीत कराचा आकडा सव्याज २५ लाखांपर्यंत गेल्याचे कर विभागातून सांगण्यात आले.पालिकेच्या मुख्य उत्पन्नस्त्रोतापैकी एक असलेला मालमत्ता कर हा महत्वाचा उत्पन्न स्त्रोत मानला जात असतानाही कर विभागाने अद्याप ५० टक्केच कर वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार महासभेत काँग्रेस नगरसेवक अनिल सावंत यांनी उजेडात आणला. या कराच्या १०० टक्के वसुलीसाठी कर विभागाकडे केवळ एक महिना शिल्लक असतानाही विभागाकडून वसुलीची मोहीम सुरू केली जात नाही. दरम्यान, अतिरीक्त आयुक्तांनी किमान एक लाखाचा कर थकविणाºयांच्या मालमत्तांना थेट सील ठोकण्याचे आदेश कर विभागाला दिले. त्याप्रमाणे काही बिल्डरांच्या मालमत्तांना सील ठोकण्याचे धाडस विभागाने दाखवले. मात्र मेहता यांच्या हॉटेलने थकवलेल्या कराची वसुली करण्याची धमक दाखविली जात नसल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.गेल्यावर्षी तत्कालिन आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी जोरदार मोहीम सुरु केली होती. मात्र त्यावेळी देखील या हॉटेलच्या थकीत कर निदर्शनास आला नाही का, त्यासाठी पालिका अधिनियमात वेगळी तरतूद नमूद केली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता. याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर अतिरीक्त आयुक्तांनी अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश कर विभागाला दिले आहेत.त्याचा वस्तूनिष्ठ अहवाल कर विभागाने त्वरित प्रभाग समिती सहा अंतर्गत चेणे येथील कर विभागाला सादर केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्याचा अंतिम अहवाल तयार करण्यास चेणे विभागाकडून दिरंगाई होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.