शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी भिडे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 02:08 IST

रिपब्लिकन पक्षाने केली मागणी; तहसीलदार, पोलिसांना दिले निवेदन

कल्याण : संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानांमुळे समाजात तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांच्या बेताल वक्तव्याची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गुरुवारी रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) केली आहे. याप्रकरणी रिपाइंच्या शिष्टमंडळाने कल्याणचे तहसीलदार अमित सानप आणि महात्मा फुले चौक पोलिसांना यावेळी निवेदन दिले.१ जानेवारी २०१८ च्या भीमा-कोरेगाव दंगलप्रकरणी मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली, पण भिडे यांना अटक का होत नाही, असा सवाल रिपाइंने दिलेल्या निवेदनात केला आहे. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता. वारकऱ्यांच्या जोडीला धारकरी असले पाहिजे. माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते, असे बेताल वक्तव्य करून स्त्रियांचा अवमान केला आहे. अशी वक्तव्ये करून भिडे एक प्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत. ज्या मनुस्मृतीने देशातील बहुजन समाजाला, स्त्रियांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले होते, अशा मनुस्मृतीचे १९२७ मध्ये महाड येथे दहन करण्यात आले. भिडे यांच्या या बेताल वक्तव्यामुळे समाजासमाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा कुटिल डाव आहे. त्यामुळे भिडे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रिपाइंने केली आहे.भिडे यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपाइंने दिला आहे. यावेळी दलितमित्र अण्णा रोकडे, भीमराव डोळस, देवचंद अंबादे, मिलिंद बेळमकर, संग्राम मोरे, संतोष जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी