शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिज्ञापत्र सहा आठवड्यांत सादर करा, अतिरिक्त आयुक्तपद नियुक्ती, उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 03:39 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि नागपूर महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या अतिरिक्त आयुक्तपदाच्या नियुक्तीला शहरातील नागरिक सुलेख डोण यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि नागपूर महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या अतिरिक्त आयुक्तपदाच्या नियुक्तीला शहरातील नागरिक सुलेख डोण यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. त्यावर, सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारला याप्रकरणी सहा आठवड्यांत प्रतिज्ञापत्र दाखल करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.घरत आणि सोनवणे यांची नियुक्ती बेकायदा असल्याकडे लक्ष वेधत त्यांना मूळ उपायुक्तपदावर आणण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सोनवणे हे निवृत्त झाले आहेत. सध्या त्यांच्याकडे नागपूर येथील स्मार्ट सिटी योजनेच्या संचालकपदाचा कार्यभार आहे. घरत आणि सोनवणे हे दोघेही केडीएमसीत उपायुक्तपदावर कार्यरत होते. परंतु, त्यांची अतिरिक्त आयुक्तपदी झालेली नियुक्ती त्या पदासाठी असलेल्या निकषात बसत नसल्याने ती बेकायदा असल्याचे याचिकाकर्ते डोण यांचे म्हणणे आहे. याबाबत, त्यांनी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडे तक्रार केली होती. त्यावर, १२ आठवड्यांत निर्णय अपेक्षित होता. परंतु, तसे न झाल्याने मे २०१६ मध्ये त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.घरत आणि सोनवणे यांची अतिरिक्त पदावर नियुक्ती करण्यासाठी भाजपाच्या दोन मंत्र्यांनी शिफारसपत्र दिले आहे.दरम्यान, याप्रकरणी दाखल असलेल्या याचिकेत राज्य सरकार, केडीएमसी, संजय घरत, रामनाथ सोनवणे आणि भाजपाच्या दोन मंत्र्यांसह अन्य पाच जणांना प्रतिवादी करण्यात आले आहे. उच्च न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करावयास सांगितले आहे.>नेहमीच अडकले वादातअतिरिक्त आयुक्त संजय घरत नेहमीच त्यांच्या विशिष्ट कार्यपद्धतीमुळे वादात अडकले आहेत. दरवर्षी सादर केल्या जाणाºया विवरणपत्रात पत्नीच्या नावे असलेली मालमत्ता त्यात नमूद न करता ती दडवल्याप्रकरणी घरत यांची लाचलुचपत विभागाकडून दोन महिन्यांपासून चौकशी सुरू आहे. आता त्यांच्या अतिरिक्त आयुक्तपदाच्या नियुक्तीच्या वादावर सरकार न्यायालयात काय भूमिका मांडते, याकडे लक्ष लागले आहे.