पंकज पाटील, अंबरनाथ/ बदलापूरमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आठवड्यापूर्वी अंबरनाथ, बदलापूरच्या केलेल्या दौऱ्यातून मनसेला काय मिळाले, याचे उत्तर देणे अवघड आहे. कार्यकर्त्यांना त्यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. मोजक्या लोकांना संवाद साधता आला आणि ‘एकदा माझ्या हाती सत्ता देऊन बघा’, हे वाक्य प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिळाली... दौºयाचा हेतू काहीही असो, राज यांना तळागाळातील कार्यकर्त्यांची उशिरा का होईना आठवण आली, हेही नसे थोडके!
जिथे तिथे एकहाती सत्ता मागण्याचा मनसेचा अट्टहास ठरतोय थट्टेचा विषय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 06:02 IST