शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये पालिका विद्यार्थ्यांचे सुरू आहे गळक्या वर्गांत शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 00:19 IST

शिक्षण मंडळाचा सावळागोंधळ। नवी इमारत ताब्यात घेण्याचे आयुक्तांचे आदेश

- सदानंद नाईकउल्हासनगर : महापालिका शाळा क्रमांक ८ व २९ मधील शेकडो मुले नवीन इमारतीऐवजी जुन्या गळक्या व धोकादायक शाळेत जीव धोक्यात घालून धडे गिरवत आहेत. या प्रकाराने पालकांनी संताप व्यक्त केला असून नवीन इमारत ताब्यात घेण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. तर, इमारत बांधकामाचे बिल न दिल्याने हस्तांतर रेंगाळल्याचे बोलले जात आहे.

उल्हासनगर पालिकेच्या दोन शाळांच्या इमारती धोकादायक होऊन गळती लागल्याने नवीन इमारतीच्या बांधकामाला तीन वर्षांपूर्वी पािलकेने मंजुरी दिली. गेल्यावर्षीच बांधलेल्या नव्या इमारतीचे हस्तांतर व्हायला हवे होते. मात्र, महापालिका व शिक्षण मंडळातील सावळ्यागोंधळामुळे इमारतीचे बांधकाम रेंगाळले. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे यांना शाळा क्रमांक २९ ला गळती लागून मुले पावसात भिजत शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली. रगडे यांनी शनिवारी दुपारी शाळेला भेट दिली असता शेकडो मुले गळक्या व धोकादायक शाळेत शिक्षण घेत असल्याचे चित्र दिसले. तसेच समोरच शाळेची नवीन इमारत बांधून तयार आहे. मात्र, कंत्राटदाराला बिल न मिळाल्याने इमारतीचे हस्तांतर झाले नाही, अशी माहिती त्यांना मिळाली. या प्रकाराबाबत रगडे यांनी संताप व्यक्त करत सर्व प्रकार आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या कानांवर घातला. महापालिकेला इमारत हस्तांतरित करण्यास तयार असून बिल दिले गेले नाही, हे कारण नसल्याचे कंत्राटदाराने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. एकूणच सावळ्यागोंधळामुळे मुले धोकादायक व गळक्या शाळेत शिक्षण घेत आहेत.

शेकडो मुलांचा जीव धोक्यातमहापालिकेच्या अनेक शाळांच्या इमारती ६० वर्षांपूर्वीच्या असून त्यांना गळती लागून धोकादायक झाल्या आहेत. अशा शाळेत शेकडो मुले जीव धोक्यात घालून शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. शाळा क्रमांक २९ व ८ ची नवीन इमारत उभी असताना मुले जुन्या इमारतीत शिक्षण घेत असल्याने, शिक्षणाप्रति महापालिकेची आस्था उघड झाली आहे.

विद्यार्थी नव्या इमारतीऐवजी धोकादायक व गळक्या इमारतीत शिक्षण घेत असल्याचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर आयुक्त देशमुख यांनी दखल घेऊन नवीन इमारत ताब्यात घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तर, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी एस.बी. मोहिते यांनी कंत्राटदाराचे बिल न दिल्याने, इमारतीचे हस्तांतर मंडळाकडे झाले नसल्याचे सांगितले. तसेच उपलेखा अधिकारी नीलम कदम यांनी इमारतीचे १० टक्के काम शिल्लक राहिल्याने इमारतीचे हस्तांतर झाले नाही, अशी माहिती दिली. विद्यार्थ्यांना गळक्या वर्गात शिक्षण घ्यावे लागत असल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.