शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगप्रकरणी अटकेत असलेल्या मुख्याध्यापकाला सोडण्यासाठी विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 22:53 IST

तक्रारदार विद्यार्थिनीवर दबावाचा प्रयत्न

भिवंडी : शेलार नदीनाका येथील हिंदी माध्यमिक शाळेत दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या १४ वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी मुख्याध्यापकाला पालकांनी चोप देत पोलिसांकडे स्वाधीन केले. पोलीस कोठडीत असलेल्या प्रमोद नायक या मुख्याध्यापकास सोडावे, या मागणीसाठी शनिवारी विद्यार्थ्यांनी तालुका पोलीस ठाण्यावर धडक दिली.नायक याला ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही बाब विद्यार्थ्यांना समजल्याने त्यांनी शाळा लवकर सुटताच विद्यार्थी व पालकांनी थेट तालुका पोलीस ठाणे गाठले. शाळेचे मुख्याध्यापक निर्दोष आहेत, त्यांना पोलीस कोठडीतून सोडून द्यावे, अशी मागणी करीत जोरजोराने घोषणा देत परिसर दणाणून सोडला. दरम्यान, या आंदोलनाची कोणतीही कल्पना नसताना अचानक आलेल्या या विद्यार्थ्यांच्या मोर्चाने प्रारंभी पोलीस बुचकळ्यात पडले होते.मात्र, त्यानंतर तालुका पोलिसांसह शांतीनगर पोलिसांनी विद्यार्थ्यांची समजूत काढत त्यांना प्रकरणाचे गांभीर्य समजावून सांगितले. त्यानंतर, विद्यार्थी आपापल्या घरी परतले. या आंदोलनामागे शाळा प्रशासन असल्याचे बोलले जात असून त्यांनीच विद्यार्थ्यांसह पालकांना फिर्याद देणाºया विद्यार्थिनीविरोधात भडकावून त्यांना पोलीस ठाण्यात पाठविले असल्याचे बोलले जात आहे.विद्यार्थ्यांना कुणी फूस लावली याचा घेणार शोधया प्रकरणात निष्पाप विद्यार्थ्यांना गोवण्याचा प्रयत्न होत असून ही कायदेशीर व न्यायालयीन प्रक्रि या आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना कुणी फूस लावून पोलीस ठाण्यात आणून घोषणाबाजी करण्यास लावले, त्याचा तपास करून दोषींविरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रि या तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांनी दिली आहे.