शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

ज्ञानसाधना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कलाकारांनी साहित्यातून घडविले मुंबई दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 17:28 IST

ज्ञानसाधना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अक्षय शिंपी आणि धनश्री खंडकर या कलाकारांनी कथा, कवितांमधून मुंबईचे दर्शन घडविले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना कलाकारांनी साहित्यातून घडविले मुंबई दर्शनज्ञानसाधना महाविद्यालयात लिटररी असोसिएशन आणि मराठी वाड्.मय मंडळाचा उद्घाटन सोहळासाहित्यातलं मुंबई दर्शन, “मुंबई – The City United” या कार्यक्रमातून सादर

ठाणे: मुंबई शहराच्या पार्श्वभूमीवर लिहीलेल्या विविध साहित्य प्रकारांच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर मुंबईकरांचे जीवनमान उलगडण्यात आले. अक्षय शिंपी आणि धनश्री खंडकर या कलाकारांनी कथा, कवितांमधून मुंबईचे दर्शन घडविले. निमित्त होते ज्ञानसाधना महाविद्यालयात आयोजित केलेल्या लिटररी असोसिएशन आणि मराठी वाड्.मय मंडळाच्या उद्घाटन सोहळ््याचे.      बुधवारी हा सोहळा ‘मुंबई द सिटी युनायटेड’ या कार्यक्रमाने संपन्न झाला. मुंबईकर, कामगार चळवळ, इथले उद्योगधंदे, खाद्यसंस्कृती, गुन्हेगारी जग, काळाबाजार, वेश्यावस्ती अशी सगळी मुंबई व्यापणारे साहित्य आज ज्ञानसाधना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले. अक्षय आणि धनश्री यांनी आपल्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांबरोबर, प्राध्यापकांचीही मने जिंकली. मुंबई – या तीन अक्षरात जणू विश्व सामावलं आहे. वसूधैव कुटुंबकम चं मूर्तरूप म्हणजे मुंबई. अनेक नावांनी गौरवली जाणारी आणि तितक्याच शिव्याशाप उरापोटात दडवून माणसांना झेलणारी हि महानगरी एका अजस्त्र पर्वतासारखी आहे. वेगवेगळे धर्म, भाषा, आर्थिकस्तर असणारी असंख्य माणस या मुंबईत राहतात. नशिबाला बांधलेल्या घड्याळासोबत धावतात, जगतात, मुंबईच हृदय धडधडत ठेवतात. त्यांचा आणि मुंबईचा संबंध म्हणजे हत्ती आणि आंधळ्या सारखा आहे. ज्याची-त्याची मुंबई निराळी आहे. सात बेटांचं हे शहर... कित्येकांना भूरळ पडणार. या शहराने इथे येणाऱ्या प्रत्येकाला आपलंसं केलंय. एकाबाजूला झगमगाट, सोनेरी स्वप्नांच्या या शहरात अंधारे, कुबट कोपरे घेऊन हे शहर विस्तारत चाललंय. अनेक लेखक, कवी, चित्रकार यांनी आपल्या कलेतून मुंबईला व्यक्त केलं. तिचा सौंदर्य टिपलं. मुंबईच्या प्रत्येक बाजूवर या डोळस माणसांनी लिहून ठेवलाय.. मुंबईकर, कामगार चळवळ, इथले उद्योगधंदे, खाद्यसंस्कृती, गुन्हेगारी जग, काळाबाजार, वेश्यावस्ती अशी सगळी मुंबई व्यापणारा हे साहित्य. काही ओळखीचं काही अनोखळी पण यातून घडणारा मुंबईचा समग्र दर्शन आपल्याला तिच्याकडे नवी नजर देणारं. हे सगळं लिहिणारी माणसं काही बाहेरची, नावाजलेली, लेखक, कवी तर काही अगदी तुमच्या आमच्यातली...मुंबई रक्तात भिनलेली, मुंबईवर प्रेम करणारी. याच प्रेमापोटी घडवलेलं हे साहित्यातलं मुंबई दर्शन, “मुंबई – The City United” या कार्यक्रमातून अक्षय शिंपी, धनश्री खंडकर या कलाकारांनी घडविले. यावेळी लिटररी असोसिएशनच्या माधुरी पाथरकर, इंग्रजी विभागाच्या प्रमुख ऋणा सजिव, प्रा. डॉ. धनंजय मुळस्कर, प्रा, जितेंद्र हळदणकर, प्रा. रुपाली मुळ््ये, बाबासाहेब कांबळे, तुषार चव्हाण, संतोष पाठारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcollegeमहाविद्यालय