शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बँक खाती उघडल्याने विद्यार्थी अचंबित

By admin | Updated: December 22, 2016 05:56 IST

महाविद्यालयाने आम्हाला कोणतीही कल्पना न देता आमचे बँक खाते उघडले आणि गेल्या काही दिवसांपासून खाते उघडण्यासाठी

ठाणे : महाविद्यालयाने आम्हाला कोणतीही कल्पना न देता आमचे बँक खाते उघडले आणि गेल्या काही दिवसांपासून खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि सह्या घेत आहेत. हा प्रकार नेमका काय याबाबत महाविद्यालयातील प्राध्यापकांना विचारल्यास थेट प्राचार्यांशी संपर्क करा, असे सांगत टाळाटाळ करीत आहे असा आरोप जोशी - बेडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला आहे. मात्र, खाते उघडण्यासंबंधी विद्यार्थ्यांना महाविद्यालय सुरू होतानाच इत्यंभूत माहिती दिल्याचे महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तसेच, उघडण्यात आलेले खाते हे विद्यार्थ्यांच्या सोयीचे असल्याचे स्पष्टीकरण महाविद्यालय प्रशासनाने दिले आहे.गोपीनाथ पाटील पारसिक जनता सहकारी बँक, नौपाडा शाखा या बँकेकडून काही दिवस खाते उघडल्यासंबंधी मोबाईलवर संदेश येत होते. मात्र आम्ही कोणतेही खाते उघडले नसताना आमचे खाते कसे उघडले गेले याबाबत चर्चा सुरू झाली. त्यादरम्यान, महाविद्यालयाने खाते उघडण्यासंदर्भातली आवश्यक कागदपत्रे आणि सह्या घेण्याचे काम सुरू केले. यावेळी जून महिन्यातच आमचे खाती उघडली गेली असून त्याची आवश्यक कागदपत्रे आता घेत असल्याचे लक्षात आले. याआधी आम्हाला कोणतीही कल्पना देण्यात आली. त्यामुळे ही खाती कशासाठी उघडली हे आम्हाला माहित नसल्याचे जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तसेच, खाते हे जूनमध्ये उघडण्यात आल्याची तारीख पासबुकवर आहे मग आता सह्या कसल्या घेतात. तसेच, पासबुकवर नॉमिनेशन रजिस्टर्ड असेही छापण्यात आले असून आमचे नॉमिनी कोण होते असे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले आहेत. यासंबंधी प्राध्यापकांना काहीही विचारले की, प्राचार्यांशी थेट बोला असे सांगतात असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच, त्यासोबत देण्यात येणारे एटीएमचा कार्ड हे ओळखपत्र म्हणून वापरता येईल. कॅन्टीनमध्येही ते वापरु शकता, असे महाविद्यालयाने सांगितले. कॅन्टीनमध्ये विचारल्यावर हे कार्ड आम्ही चालवून घेणार नाही असे सांगितल्याचेही विद्यार्थी म्हणतात.विद्यार्थ्यांच्या खात्यांची माहिती त्यांना महाविद्यालय सुरू होतानाच दिली होती. महाविद्यालयाच्या व्यवस्थापकांनी पारसिक बँकेशी याबाबत करार केला आहे. या करारानुसार आधी खाती उघडायची आणि आवश्यक कागदपत्रे आली की खाते सुरू करायचे, असे ठरले असल्याने त्यांची खाती सुरू करण्यासाठी आता त्यांच्याकडून कागदपत्रे घेतली. (प्रतिनिधी)